
वडिलांचा खून केल्या प्रकरणी मुलाला पोलिसांनी केली अटक…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील येरंडगांव येथील मृतक पुंडलिक दामुजी कांबळे यांचा खून केल्या प्रकरणी संशयित आरोपी मुलगा आदर्श कांबळे विरुद्ध अपराध क्रंमाक ५०६/२०२५ अन्वये पारवा पोलिस ठाण्यात १०३ (१) खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप नरसाळे तपास करीत आहे.
येरंडगांव येथील मृतक पुंडलिक दामुजी कांबळे (वय ५५) याला दारु पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे त्यांच्या घरात नेहमी वाद होत होते. वडील पुंडलिक कांबळे यास दारूचे व्यसन असल्याने मुलगा आदर्श कांबळे याने वडीलास अनेकदा मारहाण केली होती. २ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजताचे दरम्यान पुंडलिक दामुजी कांबळे यांस त्याच्या मुलाने फावड्याच्या दांड्याने वडीलाच्या पाठीवर इतर ठिकाणी मारहाण केली. तसेच मुलगा आदर्श कांबळे याने वडील पुंडलिक दामुजी कांबळे याला जमिनीवर पाडून त्याच्या पोटावर, छातीवर लाथा बुक्याने मारहाण केली. या मुळे वडील पुंडलिक दामुजी कांबळे यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पारवा पोलिसांनी संशयित आरोपी आदर्श कांबळे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पारवा पोलिस करीत आहे.
प्रेमप्रकरणातून दुहेरी हत्याकांड! कारागृहातून सुटला अन् प्रेयसीला भेटायला गेला…
धक्कादायक! युवतीच्या खूनाच्या तपास अन् तीन खून केल्याचे झाले उघड…
प्रेमप्रकरणाचा ट्रँगल! डॉक्टरने पत्नीला रंगेहाथ पकडले अन् केला भयंकर शेवट…
पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटून अपघात; पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू…
बीड! बडतर्फ पोलिस अधिकारी सुनील नागरगोजे यांची आत्महत्या…

