अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला खून अन् मृतदेह लपवला…

जळगावः अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून केल्या प्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीवरुन पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना गोंडगाव (ता. भडगाव) येथे घडली. या घटनेत तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

गोंड गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा खून करुन तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवल्याची धक्कादायक घटना 1 ऑगस्ट रोजी समोर आली होती. या घटनेतील संशयिताला गुरुवारी (ता. 3) पोलिसांनी अटक केली आहे. त्याला गुन्ह्याच्या घटनास्थळाची पडताळणी करण्यासाठी गावात घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन पोलिस जखमी झाले आहेत.

स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय 19) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. मुलीवर लैगिंक अत्याचार केल्यानंतर मुलीशी झालेल्या झटापटीत त्याने मुलीच्या डोक्यात दगड घातला आणि त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यातच चाऱ्यामध्ये लपवून ठेवल्याची कबुली दिली. दरम्यान, मुलगी सापडत नसल्याने मुलीच्या पालकांनी ती बेपत्ता झाल्यासह अपहरणाची तक्रार पालकांनी पोलिस स्टेशनला केली होती. त्यानुसार भडगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयिताच्या अटकेसाठी कुटुंबियांसह नातेवाईकांनी भडगाव पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन आंदोलन करत अत्यसंस्कार न करण्याचा पावित्रा घेतला होता.

कडब्याच्या कुट्टीतून दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार 1 ऑगस्ट रोजी उघडकीस आला. ज्या कडब्याच्या कुट्टीत मृतदेह मिळाला तो गोठा स्वप्नील विनोद पाटील (वय 19, रा. गोंडगाव ता. भडगाव) याचा असल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी स्वप्निल याला अटक केली. 30 जुलै रोजी दुपारी सदर मुलीला आमिष दाखवून संशयिताने त्याच्या गोठ्यात तिला बोलावले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर प्रकरण उघड होऊ नये म्हणून तिच्या चेहऱ्यावर दगड मारुन तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह त्याने गोठ्यातील कडब्याच्या कुट्टीखाली लपवून ठेवला होता, अशी कबुली दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! सावकाराने पतीसमोरच पत्नीवर केला बलात्कार…

धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील शाळेच्या बाथरूमध्ये मुलीवर बलात्कार…

धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार…

छत्रपती संभाजीनगर हादरलं! अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार…

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!