पुणे जिल्ह्यातील जगदंबा हॉटेलमध्ये भीषण स्फोट; 10 कर्मचारी भाजले…

पुणे : दौंड-पाटस रस्त्यावरील जगदंब हॉटेलमध्ये आज (बुधवार) दुपारच्या सुमारास गॅसचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात हॉटेलमधील 10 कामगार गंभीर भाजले असून सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील सहा कामगारांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जगदंब हॉटेलमध्ये दुपारच्या वेळी नेहमीप्रमाणे स्वयंपाकाचे काम सुरू होते. याच दरम्यान स्वयंपाकघरात असलेल्या गॅस सिलिंडरमधून अचानक गॅस गळती होऊन जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज परिसरात दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटाच्या झटक्याने स्वयंपाकघरातील साहित्य हवेत उडाले आणि आगीच्या ज्वाळांमध्ये कामगार होरपळले. काही कामगारांना बाहेर पळण्याची संधी मिळाली, तर काही जण तिथेच अडकले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)


घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आणि जखमी कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथम उपचार केल्यानंतर गंभीर जखमींना ससून रुग्णालयात हलवण्यात आले.

Police-Book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

दरम्यान, या घटनेनंतर पोलिस प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा करून स्फोटाच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू केला आहे. गॅस सिलिंडरची गळती, सुरक्षा नियमांचे उल्लंघन किंवा अन्य तांत्रिक बिघाड याबाबत चौकशी केली जात आहे. जखमी कामगारांच्या प्रकृतीकडे प्रशासनाचे लक्ष असून त्यांच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत दिली जात असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

खासगी बसला आग लागून 17 जणांचा होरपळून मृत्यू…

खासगी बसला मोटरसायकलने दिली धडक; 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू…

पुणे शहरात मध्यरात्री भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू…

पुणे! चहाच्या टपरीवर सिलिंडरचा स्फोट; अनाथ संतोष पहिल्याच दिवशी होरपळून मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!