
ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. विजय राऊत यांची ‘म्हाडा’च्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती…
पुणे (संदिप कद्रे) : महर्षीनगर (गुलटेकडी) येथील ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. विजय वैजीनाथ राऊत यांची पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) पुणे विभागावर कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ऍड. राऊत हे गेल्या ३० वर्षांपासून विधी क्षेत्रात कार्यरत असून, मागील १९ वर्षांपासून ते भारत सरकारचे ‘नोटरी’ म्हणूनही सेवा देत आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा विचार करून ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र शासनाची विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये, राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका आणि पतसंस्थांवर कायदेशीर सल्लागार म्हणून गेल्या १० वर्षांपासून यशस्वी काम पाहिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विधी व सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

