हृदयद्रावक! बापलेकाने एकमेकांना घट्ट मिठी मारून रेल्वेखाली केली आत्महत्या…

मुंबईः मुंबईतील भाईंदर रेल्वे स्थानकावर जाऊन बाप-लेकाने एकमेकांना घट्ट मिठी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंगावर काटा आणणारे फुटेज सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हरिश मेहता (वय 60), जय मेहता (वय 35) अशी आत्महत्या केलेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन खाली उडी मारुन दोघांनी आत्महत्या केली आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

रेल्वे स्थानकावर बाप-लेक एकत्रच आले होते. त्यानंतर ते प्लॅटफॉर्मवरुन ट्रॅकवर उतरले त्यानंतर घट्ट मिठी मारुन ते रेल्वेखाली गेले आणि जीवन यात्रा संपवली. बाप-लेक नालासोपारा येथील राहिवासी असल्याची माहिती असून या प्रकरणी वसई पोलीसात गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. आर्थिक व्यवहारातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. वसई जीआरपीने या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनेचा तपास सुरू केला आहे.

दरम्यान, बाप लेक अचानक रेल्वे ट्रॅकसमोर आल्याने लोको पायलला रेल्वे अचानक थांबवणे शक्य झाले नाही. लोको पायलटने रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अपयशी ठरला. दोघे पिता-पुत्र विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनसमोर आडवे झाले. बाप लेकाच्या अंगावरुन लोकल ट्रेन गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक लोकल ट्रेनसमोर दोन जण येताना पाहून ट्रेनच्या ड्रायव्हरने लोकल ट्रेन थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. पण ट्रेन थांबली तोपर्यंत दोघेही ट्रेनखाली आले. आत्महत्या केलेले दोघेही बाप-लेक असून ते नालासोपारा येथील रहिवासी होते. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एडीआरशिवाय गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शाळेत प्रेम! प्रेमविवाह केलेल्या पती पत्नीचा हृदयद्रावक शेवट…

हृदयद्रावक! पहिल्या नजरेत प्रेम, लग्न अन् अवघ्या ५ महिन्यांची साथ…

हृदयद्रावक! पोलिस भरतीसाठी धावताना अक्षय जमीनीवर कोसळला अन्…

हृदयद्रावक! पतीला फोन करून मुलीचं शेवटचं तोंड पाहा म्हणाली अन्…

हृदयद्रावक! एक तासापूर्वी माहेरी आलेल्या नवविवाहितेचा वीज पडून मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!