बीड जिल्ह्यातील आणखी एका सरपंचाचा गेला जीव; अपघात की घातपात?…

बीड: राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वाराला उडवले आहे. या अपघातात विद्यमान सरपंचाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरपंचाच्या मृत्यूनंतर अपघात की घातपात? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर अपघात झाला असून ही धडक एवढी जोरात होती की या अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामिण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघात प्रकरणी चालकाला पकडण्यात आले आहे.

बीज जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील अनेक बेकायदेशीर कृत्यांची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात परळीतील वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप झाले. विद्युत केंद्रातील राखेचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशातच परळीत राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दिलेल्या धडकेत एका सरपंचाचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत.

परळीत महानिर्मितीचे औष्णिक वीज केंद्र आहे. या औष्णिक वीज केंद्रातून दररोज राख निर्मिती होते. या राखेची अधिकृत आणि अनधिकृत वाहतूक होत असते. शनिवारी (ता. ११) रात्रीच्या सुमारास मिरवट फाट्यावर हा भीषण अपघात झाला. ही धडक एवढी जोरात होती की या अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीचा चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघात प्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, अपघातानंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राखेच्या काळाबाजाराने स्थानिक त्रस्त आहेत. राखेची वाहतूक करणारे टिप्पर, ट्रक हे उघड्याने राखेची वाहतूक करतात. त्यामुळे राख उडते आणि लोकांच्या डोळ्यात जाते. त्याशिवाय, राखेमुळे इतर समस्या निर्माण झाल्या आहेत.

वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…

वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…

वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…

वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…

बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…

बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…

सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…

बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…

वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…

वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…

संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…

वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…

वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…

वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…

वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…

भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…

आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…

भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…

पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!