
नितीन देसाई यांच्या पत्नीने केले गंभीर आरोप; तक्रारीत म्हटले की…
मुंबई : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांची पत्नी नेहा यांनी फायनान्स कंपनी एडलवाईस विरोधात तक्रार दाखल केली आहे. फायनान्स कंपनीसह अधिकाऱ्यांनी कर्जाच्या वसुलीसाठी दबाव टाकल्यामुळे नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, असा आरोप नेहा देसाई यांनी तक्रारीत केला आहे. तर या प्रकरणी एडलवाईस कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.
फायनान्स कंपनीने निवेदनात म्हटले की, ‘नितीन देसाई यांच्या कंपनीला थीम पार्क आणि भांडवल उभारण्यासाठी २०१६ आणि २०१८ मध्ये कर्ज दिले होते. पण २०२० नंतर कंपनी आर्थिक अडचणीत सापडली. त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले गेले पण त्यात यश आले नाही. शेवटी NCLT न्यायालयाने या प्रकरणी प्रशासक नेमला. आमच्या कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य केलेले नाही. सर्व प्रक्रिया कायद्यानुसार करण्यात आल्या आहेत. व्याजदार जास्त आकरण्यात आलेला नाही. शिवाय, कर्जाच्या वसुलीसाठी कर्जदारावर अनावश्यक दबावही टाकलेला नाही. या प्रकरणी चौकशी करण्यात येणार असून, त्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू.’
नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जतमधील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. एनडी स्टुडिओ हडपण्यासाठी Edelweiss फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना वेगवेगळी आश्वासने दिली. मोठं कर्ज दिलं, पण कोरोना काळात सगळा व्यवसाय ठप्प होता. त्यावेळी कर्ज फेडण्यासाठी दबाव टाकला गेला, असा आरोप नेहा देसाई यांनी तक्रारीत केला आहे. नितीन देसाई यांनी त्यांच्या ऑडिओ क्लिपमध्येही Edelweiss कंपनीच्या लोकांची नावे घेतली आहे.
फायनान्स कंपनीला आमच्या स्टुडिओत गुंतवणूकदार येऊ द्यायचे नव्हते. आमची मालमत्ता बळकावायची होती, असा हेतू दिसत होता. त्यामुळेच माझे पती मानसिक दडपणाखाली होते. मी त्यांना धीर देण्याचाही प्रयत्न केला होता. न्यायालयाने प्रशासक म्हणून नेमलेल्या जितेंद्र कोठारी यांचाही फायनान्स कंपनीच्या सांगण्यावरून स्टुडिओ ताब्यात घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नितीन देसाईंच्या पत्नीने केला आहे. पाचही जणांनी कर्जाच्या वसुलीसाठी नितीन देसाई यांना मानसिक त्रास दिल्याचा आणि या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली, असे नेहा देसाई यांनी तक्रारीत म्हटले आहे.
नितीन देसाई यांच्या मृत्यूच्या रात्री नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर…
नितीन देसाई यांच्या आत्महत्येपूर्वी ११ ऑडिओ क्लिप; पहिले वाक्य…
नितीन देसाई यांच्या आत्महत्येची मित्राने सांगितली कहाणी; अहवाल समोर…
मोठी बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…