
डॉक्टर बलात्कार आणि हत्या! पोलिसांच्या तीक्ष्ण नजर अन् आरोपीचे फुटलं बिंग…
कोलकता: कोलकता येथे ज्युनियर महिला डॉक्टरवर बलात्कार करून क्रूरपणे हत्या झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवली आणि संजय रॉय या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
महिला डॉक्टरवर बलात्कार करून क्रूरपणे हत्या केल्यानंतर आरोपीने गुन्हा लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेने ‘ती’ वस्तू हेरली अन् आरोपीचे बिंग फुटले. आरोपीला अटक करुन 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवतीची अत्याचार करून क्रूरपणे हत्या…
आरोपी संजय रॉयचे नियमित या रुग्णालयात येणे-जाणे सुरु होते. घटनेच्या दिवशीही घटना घडली त्यावेळी आरोपी रुग्णालयात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरुन निष्पन्न झाले होते. मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास आरोपी संजय कॉरीडोरमध्ये फिरताना सीसीटीव्हीत दिसला होता. रुग्णालयातील परिचारिका आणि अन्य स्टाफने त्याला ओळखले. हा व्यक्ती रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णालयात येत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्या जबाबात विरोधाभास आढळून आला. आपण रुग्णांची चौकशी करण्यासाठी येथे आल्याचे त्याने सुरातीला पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी सदर रुग्णांची चौकशी केली असता संजय आपल्या तीन दिवसांपासून भेटलाच नसल्याचे त्यांनी सांगितले. घटनेनंतर घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांना चौथ्या मजल्यावरील सेमिनार कक्षात ब्लूटुथची तुटलेली वायर सापडली. पोलिसांनी सीसीटीव्हीची फुटेज बारकाईने तपासले असता त्यांच्या लक्षात आले की, संजय रुग्णालयात आला तेव्हा त्याच्या गळ्यात ब्लूटुथ होता. मात्र तो रुग्णालयातून बाहेर पडला तेव्हा त्याच्या गळ्यात ब्लूटुथ नव्हता. पोलिसांनी चौकशी केली असता सदर तुटलेली ब्लूटुथची वायर संजयच्या ब्लूटुथचीच असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची उकल करत आरोपीला अटक केली. आरोपीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पोलिस सखोल चौकशी करत आहेत.
Video: चंदू चव्हाण यांचे उपोषण तात्पुरते स्थगित; मदतीचे आवाहन…
महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणारा विकृत ताब्यात…
सोलापूर हादरलं! मित्राचे दीड महिन्यांपूर्वी निधन अन् त्याच्या पत्नीवर बलात्कार…
संतापजनक! सामूहिक बलात्कारातील पीडित मुलीवर पुन्हा बलात्कार अन्…
धक्कादायक! महाराष्ट्रातील चिमुकलीवर पंरप्रांतीय व्यक्तीने केला बलात्कार…

