शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केली अटक…

पुणे (संदिप कद्रे): शेअर मार्केटमध्ये ज्यादा परतावा देण्याचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आणि वर्षाभरापासून फरार असणाऱ्या आरोपीस कोंढवा पोलिसांनी मुंबई येथून जेरबंद केले आहे.

कोंढवा पोलिस ठाणे पुणे शहर गुरन, २८४/२०२३ भादवि कलम ४२०,४०६,४६७,४६८,४७१ प्रमाणे गुन्हा दाखल असून, सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी शुभम सुनिल देवगांवकर (रा. मे. जे फॉर्चून इन्व्हेस्ट वेल्थस्टिक रा. हिल व्हयु, रेसिडेन्सी रेनुका नगर वारजे पुणे) याने फिर्यादी व साक्षीदार यांच्याशी ओळख करुन त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकीबाबत माहिती देवून त्याना ज्यादा परताव्याचे आमिष दाखवुन ३ टक्के दरमहा नफा/व्याज स्वरुपात देतो असे सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केली तसेच शुभम हा पैसे परत देत नसल्याने आम्ही त्याचे ऑफीसला जावुन पाहिले असता त्याचे ऑफीस बंद असल्याने तेथे बरेच लोक उभे होते ज्यांचे शुभम देवगांवकर याने पैसे गुंतवणुक करुन देतो असे सांगून पैसे परत मागितले असता तसेच शुभम देवगांवकर यास पैसे परत मागितले असता बँकेचे बनावट व खोटे स्टेटमेंट पाठवुन आमची फसवणुक केली आहे.

शुभम देवगांवकर याने असेच इतर बरेच लोकांचे पैसे गुंतवणुक करुन देतो असे सांगून आर्थिक फसवणुक केली आहे असे फिर्यादीवरुन वरिलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयात आरोपी नामे शुभम सुनिल देवगांवकर हा गुन्हा केल्यापासुन गेले एक वर्षापासून फरारी होता. सदर आरोपी याचा तपास राजेश उसगांवकर, सहा. पोलिस निरीक्षक, पोलिस अंमलदार महारनवर, पोलिस अंमलदार वडतीले, पोलिस नाईक डिंबळे, पोलिस अंमलदार हिरवे यानी आरोपीचे नवीन मोबाईल क्रमाक बातमीदार मार्फत मिळवून नंतर त्यानंबरचे सीडीआर व एसडीआर च्या सहाय्याने मुंबई येथे असल्याचे लोकेशन प्राप्त झाले होते. गुन्हयातील पाहिजे आरोपी शुभम सुनिल देवगांवकर हा आम्हाला फोर्ट मुबई परिसरात मिळून आल्याने त्याचेकडे चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास राजेश उसगांवकर, सहा. पोलिस निरीक्षक हे करीत आहेत.

वरिलप्रमाणे कामगिरी ही ए आर राजा, पोलिस उप आयुक्त परि.०५, गणेश इंगळे, सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मानसिंग पाटील निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सपोनि उसगांवकर, पोलिस अंमलदार महारनवर, पोलिस अंमलदार वडतीले, पोलिस नाईक डिंबळे, पोलिस अंमलदार हिरवे यानी केली आहे.

पुणे शहरात पिस्टल बाळगणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी केली अटक…

कोंढवा पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या; पिस्टल, काडतुसे जप्त…

कोंढवा पोलिसांनी मोक्कामधील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाची कौशल्यपुर्ण सुपरफास्ट कामगिरी…

कोंढवा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस १० तासात केली अटक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!