
पती, पत्नी और वो! तिघेही हॉटेल रूममध्ये गेले अन् पुढे…
इटानगर (अरुणाचल प्रदेश): एका हॉटेलमधील रुम तिघांनी बुक केली होती. काही वेळानंतर खोलीमध्ये गेल्यानंतर तिंघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुडील तपास करत आहेत. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची चर्चा आहे.
पोलिस दल, स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचय?
मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तिघेही केरळचे रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील कोट्टायम येथील नवीन थॉमस (वय 39) हे तिरुवनंतपुरम येथील रहिवासी पत्नी देवी बी (39) आणि आपली मैत्रीण आर्य बी नायर (29) यांच्यासोबत 28 मार्च रोजी हॉटेलमध्ये राहण्यासाठी आले होते. सोमवारपासून तिघेही दिसत नव्हते आणि मंगळवारी पहाटे त्यांना संशय आल्यावर कर्मचारी तपासणी करण्यासाठी गेले. यावेळी रूम आतून बंद असल्याचे आढळून आले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला तेव्हा त्यांना तिन्ही लोक मृतावस्थेत आढळले नायरचा मृतदेह पलंगावर होता, तिचे मनगट ब्लेडने कापलेले होते तर देवी बी यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. त्यांच्याही मनगटाच्या उजव्या बाजूलाही कापल्याच्या खुणा होत्या. डाव्या हाताच्या मनगटावर जखमेच्या खुणा असलेला थॉमस वॉशरूममध्ये मृतावस्थेत आढळला.’
दरम्यान, या गूढ घटनेबाबत पोलिस कसून, तपास करत आहेत. दुसरीकडे तिरुअनंतपुरममध्ये नायर बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रेम! प्रेयसी असलेल्या मामाच्या मुलीला ओढ्याजवळ बोलावले अन् पुढे…
दिराच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली वहिनी अन् पुढे तर…
प्रेमात वेडे! प्रेयसीसह जवानाला बेड्या; नवऱ्याचा गेला जीव…
पोलिस अधिकाऱ्यासोबत महिला डॉक्टरचे प्रेमसंबंध अन् आत्महत्या…
सैराटची पुनारवृत्ती! प्रेमविवाहानंतर बाप आणि भाऊ चिडला अन्…

