विषारी दारू! पुणे ग्रामीण पोलिस दलातील चार जणांचे तत्काळ निलंबन…

पुणे: पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड परिसरात हातभट्टीच्या विषारी दारूमुळे आतापर्यंत १८ जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. अद्याप अनेकजण रुग्णालयात उपचार घेत असून काही जणांची प्रकृती नाजूक आहे. या प्रकरणाचे पडसाद आता पुणे ग्रामीण पोलिस दलात उमटले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती याच्याशी काही पोलिस संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक चौकशीत म्होरक्याशी कनेक्शन असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस दलातील चार कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी आज (सोमवार) हा आदेश जारी केला आहे. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये दौंड पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील सुभाष डोईफोडे, उरुळी कांचन पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार अजित शिवाजी काळे आणि पोलिस शिपाई सुमित नंदकुमार वाघ तर यवत पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार रामदास ज्ञानदेव जगताप यांचा समावेश आहे.

विषारी दारू प्रकरणातील आरोपी राधेश्याम प्रजापती हा उरुळी कांचन परिसरातील रहिवासी असून त्याचे या चारही पोलिस कर्मचाऱ्यांशी संपर्क असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. या संदर्भात अपर पोलिस अधीक्षक, बारामती विभाग यांच्यामार्फत करण्यात आलेल्या चौकशीत संबंधित कर्मचाऱ्यांचे वर्तन पोलिस दलाच्या शिस्तीला बाधक आणि अत्यंत संशयास्पद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या चौकशी अहवालाच्या आधारे महाराष्ट्र पोलिस अधिनियम आणि महाराष्ट्र पोलिस नियमांनुसार या चौघांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून, त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता लक्षात घेऊन निलंबन काळात या सर्व कर्मचाऱ्यांचे मुख्यालय पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालय निश्चित करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच सकाळ-संध्याकाळ अशी दिवसातून दोन वेळा पोलिस मुख्यालयात हजेरी लावणे त्यांच्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पुणे! विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, 9 पोलिस अधिकारी निलंबित, पाहा नावे…

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा बळी; भावाच्या मृत्यूचा धक्का…

पुणे! पोलिस अधिकारी गणेश तनपुरे यांचे हृदयविकाराने निधन; दोन दिवसांवर आली होती बदली…

पुणे शहरात लक्ष्मीनगर पोलिसांकडून दारूभट्ट्या चालवणाऱ्या महिलांसाठी प्रशिक्षण मेळावा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!