धक्कादायक! सामूहिक हत्याकांडावेळी गोळीबार केला अन् चिरले सहा जणांचे गळे…

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटकमधून राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील गोविंदपूर भागामध्ये ६ जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळीबार आणि गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडली असल्याची माहिती पुढे आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर गावात आज (शुक्रवार) सायंकाळी ही भीषण घटना घडली. या घटनेत सहा जणांची हत्या करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोविंदपूर गावात निराळे आणि गुळगी (गोलगी) कुटुंबांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीच्या वादावरून संघर्ष सुरू होता. या जुन्या वैमनस्यातूनच हा रक्तरंजित हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी गावात येऊन गोळीबार केला. या हल्ल्यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे, शब्बीर अत्तार यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाला असून, परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत. या सामूहिक हत्याकांडामुळे विजयपूर जिल्हा हादरला आहे. घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून, सीमाभागातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे.

पुणे शहरात कुख्यात तडीपार गुंडाची कोयत्याने सपासप वार करून हत्या…

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा बळी; भावाच्या मृत्यूचा धक्का…

रिलस्टार रोहिणी पाराध्ये हिने आयुष्य का संपवलं? कारण आलं समोर…

धक्कादायक! मृत नवरी निघाली जिवंत अन् थेट पोहचली पोलिस स्टेशनला…

नातेवाईकांचा आक्रोश होता हृदय पिळवटून टाकणारा; चिमुकल्यासह आईचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!