पुणे शहरात पाण्याच्या टँकरमध्ये सापडला महिलेचा मृतदेह…

पुणे : पुणे शहरात टँकरमधील पाण्याच्या टाकीमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. अज्ञात महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे.

हडपसरमधील फुरसुंगी परिसरातील पावर हाऊस हरपळे वस्ती या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती मिळतात पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढला. टँकरमध्ये सापडलेला मृतदेह महिलेचा असून हा मृतदेह कोणाचा आणि त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिस पुढील तपास करत आहेत. टँकरमध्ये मृतदेह सापडल्याची घटना समजल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, संबंधित पाण्याचा टँकर कुणाचा आहे, कुठून आला, हा मृतदेह कुणाचा, असे विविध प्रश्न निर्माण झाले असून परिसरामध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. हरपळे वस्ती परिसरातील महागणपती मंदिराच्या जवळ उभ्या असलेल्या टँकरमध्ये हा महिलेचा मृतदेह आढळला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरात सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल व दोन राऊंड जप्त…

Video: पुणे शहरातील युवतीचा रील्ससाठी जीवघेणा स्टंट…

Video: पुणे शहर पोलिसांकडून फॅक्टरीवर छापा; लाखो रुपयांचा गुटखा जप्त…

पुणे शहरात अल्पवयीन मुलांकडून रॉडने हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न अन्…

पुणे अपघात! निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!