लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत युवक-युवती पार्टी करून आले अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): युवक आणि युवती एकत्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांमध्ये झालेल्या भांडणानंतर युवकाने गोळी मारून युवतीचा खून केला आहे. यानंतर फरार झालेल्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. लखनौ शहराच्या उच्चवस्तीत परिसरातील सुशांत गोल्फ सिटीमधील पॅराडाइज क्रिस्टल अपार्टमेंटमधील ही घटना आहे.

मृत युवती रिया ही व्यावसायाने मेकअप आर्टिस्ट होती. शिवाय, ती सोशल मीडियावर एक्टिव्ह होती. इन्स्टावर तिचे लाखो फोलोअर्स होते. ज्या फ्लॅटमध्ये तिचा मृत्यू झाला तो तिनेच भाड्याने घेतला होता आणि ऋषभ सिंह नावाचा युवक तिच्यासोबत राहत होता. रियाचे घरचे लखनौमध्येच वेगळ्या भागात राहात होते. १७ ऑगस्टच्या सकाळी रियासोबत बोलणं झाले नाही, तिचा फोन उचचला जात नव्हता म्हणून आई तिच्या घरी पोहचली. तिच्या घरचा दरवाजा आतून बंद होता. जेव्हा आईने दरवाजा उघडला तेव्हा रियाचा मृतदेह खोलीत आढळला.

पोलिसांनी एका ठिकाणाहून ऋषभला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी खाकीचा धाक दाखवताच ऋषभने हत्येची कबुली दिली. १६ ऑगस्टच्या रात्री रियासोबत तो एका पार्टीला गेला होता. तिथून परतताना रियासोबत त्याचे भांडण झाले. रिया पार्टीत दुसऱ्या मुलांशी बोलत होती. त्यामुळे ऋषभ नाराज झाला. रात्री दोघेही नशेत होते. त्यामुळे दोघे झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यात रागाच्या भरात ऋषभने रियाला २ गोळ्या मारल्या.

रियाच्या आईने तपासात सांगितले की, ‘एका पार्टीत ऋषभसोबत रियाची ओळख झाली. त्यावेळी तिच्या ड्रिंकमध्ये ऋषभने गुंगीचे औषध दिले होते. त्यानंतर तिला ब्लॅकमेल करणे सुरु केले. रियाला ऋषभसोबत राहायचे नव्हते. परंतु ब्लॅकमेल करून रियाला त्याच्यासोबत राहणे मजबूर केले. अलीकडेच या प्रकरणी १०९० नंबरवर कॉल करून पोलीस तक्रार केली होती.’ दरम्यान, पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रियकराला धडा शिकवण्यसाठी युवतीने केले नको ते कृत्य…

प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…

प्रियकर आणि प्रेयसी ओयो हॉटेलमध्ये अन् काही वेळानंतर…

संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…

प्रेयसीला म्हणाला; पोटात असलेल्या माझ्या बाळाला जन्म दे अन्…

लॉजवर मैत्रिणीसोबत असताना शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने युवकाचा मृत्यू…

Video: नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!