अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू…

अमरावती : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात आज (सोमवार) पहाटे भीषण आग लागली. त्यामध्ये तीन लहान बालकांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. तर या कक्षात असलेल्या सहा अर्भकांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे साडेतीनच्या सुमारास व्हेंटिलेटरमध्ये अचानक […]

अधिक वाचा...

धक्कादायक! पुण्यातून कमरेला जिलेटिन बांधून सासरवाडीत गेला अन् दाबले स्विच; एका क्षणात…

पुणे : पत्नी अन् मुले घर सोडून माहेरी गेल्याच्या रागातून एकाने सासरी जात स्फोट घडवून आणल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण आणि आत्मघाती स्फोटात आरोपी पतीसह त्याच्या १५ वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर इतर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील अलंद तालुक्यातील मटकी तांडा येथे ही हादरवून टाकणारी घटना […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरात भीषण आग…

पुणे: पुणे शहरातील ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरात आज (गुरुवार) दुपारी अचानक भीषण आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शनिवारवाड्याच्या मुख्य गेटजवळ साठलेला कचरा आणि वाळलेल्या लाकडांनी पेट घेतल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आज दुपारी साडे बाराच्या सुमारास अचानक आग लागली. गेटच्या परिसरात मोठ्या […]

अधिक वाचा...

नागपूर! स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; 12 कामगारांचा मृत्यू…

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL कंपनीत आज (रविवार) सकाळी सातच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या भीषण स्फोटात 12 कामगारांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. बारुद आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत हा मोठा स्फोट झाला आहे. कंपनीत झालेल्या भीषण स्फोटानंतर परिसरात मोठा आवाज झाला. स्फोटात जखमी कामगारांना […]

अधिक वाचा...

Video: पुणे शहरात आगीचे रौद्र रूप, ६० वाहने जळून खाक…

पुणे : पुणे शहरातील येरवडा परिसरात आज (सोमवार) दुपारी लागलेल्या भीषण आगीत ६० वाहने जळून खाक झाली आहेत. भूमी अभिलेख कार्यालयाजवळील एका मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या 40 दुचाकी आणि 20 चारचाकी वाहने जळाल्याची माहिती पुढे आली आहे. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. येरवडा परिसरातील या मोकळ्या जागेत पोलिसांनी जप्त केलेली तसेच […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यातील जगदंबा हॉटेलमध्ये भीषण स्फोट; 10 कर्मचारी भाजले…

पुणे : दौंड-पाटस रस्त्यावरील जगदंब हॉटेलमध्ये आज (बुधवार) दुपारच्या सुमारास गॅसचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात हॉटेलमधील 10 कामगार गंभीर भाजले असून सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील सहा कामगारांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जगदंब हॉटेलमध्ये दुपारच्या वेळी नेहमीप्रमाणे स्वयंपाकाचे काम सुरू होते. याच दरम्यान […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी टळला मोठा अनर्थ…

सासवड (पुणे): अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पहाटे साडेचारच्या सुमारास सासवड परिसरातील दीप पॅकेजिंग या पुष्ट्याचे बॉक्स तयार करणाऱ्या फॅक्टरीला अचानक आग लागल्याची घटना घडली. ही फॅक्टरी प्रमोद कोठारी यांची असून, आगीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. जमीन मालक मोना ढुमे हे अंगारकी चतुर्थी निमित्त पहाटे […]

अधिक वाचा...

जेजुरीत खंडोबाच्या पायरीवर भंडाऱ्याचा भडक्यात 16 जण जखमी; प्रत्यक्षदर्शीने सांगितले…

पुणे: खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीवर भाविक व कार्यकर्त्यांनी भंडारा अर्पण करताना अचानक भीषण भडका उडून किमान 16 जण गंभीर भाजल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये दोन नव्याने निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकांसह अनेक महिला, तरुणांचा समावेश आहे. भंडाऱ्याने पेट घेतला आणि जोरदार आवाजासह स्फोट होऊन आजूबाजूचे लोक होरपळले. भाजलेल्या जखमींना तातडीने जेजुरीतील खाजगी तसेच शासकीय रुग्णालयात […]

अधिक वाचा...

सौदी अरेबियात बसचा भीषण अपघात, 42 भारतीयांचा आगीत होरपळून मृत्यू…

दुबईः सौदी अरेबियातील मदिना येथे बसला झालेल्या भीषण अपघातामध्ये 42 भारतीय नागरिकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडल्याची भीती व्यक्त केली आहे. हे सर्वजण हैदराबाद आणि तेलंगणा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. सौदीतील बद्र-मदिना महामार्गावर रविवारी रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार) हा अपघात झाला. याठिकाणी प्रवासी बस आणि एका डिझेल टँकरची जोरदार […]

अधिक वाचा...

खासगी बसला मोटरसायकलने दिली धडक; 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू…

कुर्नूल : आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात खासगी बसला झालेल्या अपघातातनंतर लागलेल्या आगीत 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास उलिंडाकुंडा परिसरात ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. हैदराबादवरून बंगळुरूकडे निघालेल्या एका खासगी व्होल्वो बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते. प्रवासादरम्यान बसला एका मोटरसायकलने धडक दिली आणि काही क्षणांतच बसला भीषण […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!