बांगलादेशात आणखी एका हिंदू नागरिकाची हत्या; लेकीसोबतचा ठरला शेवटचा सेल्फी…

ढाका: बांगलादेशातील नरसिंदी जिल्ह्यात एका हिंदू व्यापाऱ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. गेल्या २४ तासांत हिंदू समाजातील व्यक्तीची हत्या होण्याची ही दुसरी घटना आहे. यामुळे स्थानिक अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मणी चक्रवर्ती यांनी घेतलेले देवीचं दर्शन आणि लेकीला कडेवर घेऊन काढलेला सेल्फी शेवटचा ठरला आहे.

एका हिंदू व्यापाऱ्याची सोमवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली, ज्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. चारसिंदूर बाजारपेठेत किराणा दुकान चालवणारे मणी चक्रवर्ती हे ५ जानेवारी रोजी रात्री १० च्या सुमारास आपल्या दुकानात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी अचानक हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मणी चक्रवर्ती हे मदन चक्रवर्ती यांचे ज्येष्ठ पुत्र असून ते परिसरातील एक प्रतिष्ठित व्यापारी म्हणून परिचित होते. या घटनेमुळे गेल्या काही दिवसांत बांगलादेशात हिंसाचाराला बळी पडलेल्या हिंदूंच्या मृतांची संख्या आता ६ वर पोहोचली आहे. हिंदू समाजाला सातत्याने लक्ष्य केले जात असल्याचे वास्तव समोर येत आहे.

दरम्यान, ५ जानेवारी रोजी जेसोर जिल्ह्यातील मोनिरामपूर येथे राणा प्रताप बैरागी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हिंसाचाराची मालिका सुरूच मानवाधिकार संघटनांच्या अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांत बांगलादेशातील अल्पसंख्याक समाजावर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. डिसेंबर २०२५ मध्ये मैमनसिंह येथे दीपू चंद्र दास, बजेंद्र बिस्वास आणि अमृत मंडल यांच्या हत्या झाल्या होत्या. तर जानेवारी २०२६ च्या सुरुवातीलाच शरियतपूरमध्ये खोकोन दास नावाच्या व्यक्तीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. भारताने या सातत्याने होणाऱ्या हत्यांबाबत बांगलादेशच्या अंतरिम सरकारकडे तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अल्पसंख्याक हिंदू समाजाच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी भारताकडून करण्यात आली आहे.

बांगलादेशमध्ये भीषण आगीत ४३ जणांचा होरपरळून मृत्यू…

भारतासमोर परदेशी नागरिकांची घुसखोरी बनली मोठी डोकेदुखी!

अभिनेता सैफच्या घरात कसा घुसला? आरोपीने सगळंच सांगितलं; बांगलादेशला पळणार तोच…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!