नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; 15 जणांचा जागीच मृत्यू, नोटांसाठी गर्दी…

न्यूयॉर्क: दक्षिण अमेरिकेतील बोलीविया या देशात शुक्रवारी (ता. २७) विमान अपघातग्रस्त झाले. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून किमान 30 जण जखमी झाले आहेत. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. राजधानी ला पाझजवळील एल आल्टो शहरात बोलीविया एअरफोर्सचे हरक्युलिस C-130 या विमानाला अपघात झाला आहे.

स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 6 वाजता अपघात घडला आहे. लँडिंग किंवा टेक-ऑफदरम्यान विमान धावपट्टीवरून घसरल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर विमानाने विमानतळाची सीमाभिंत तोडत थेट रस्त्यावर कोसळले. विमान अनेक कार आणि इतर वाहनांवर आदळले. ही धडक इतकी भीषण होती की अनेक वाहने पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली आहेत.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

विमान देशाच्या विविध भागांत नवीन चलनी नोटा पोहोचवण्यासाठी जात होते. अपघातानंतर रस्त्यावर नोटा विखुरलेल्या अवस्थेत आढळल्या. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी नोटांसाठी गर्दी केली होती. काही जणांनी याचे व्हिडिओ चित्रण केले असून ते आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या लष्करी विमानाने यापूर्वी सांता क्रूझ शहरातून उड्डाण केले होते आणि एल आल्टो येथे धावपट्टीवरून घसरून जवळील रस्त्यावर उतरल्यानंतर हा अपघात झाला.

राष्ट्रीय विमान कंपनी बोलिवियाना डी एव्हिएशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपघातानंतर एल आल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले होते. तसेच, या अपघातात सहभागी झालेले विमान त्यांच्या ताफ्यातील नव्हते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचा विमान अपघातात मृत्यू; ओळख पाहा…

अहमदाबाद विमान अपघाताचा Video रेकॉर्ड करणारा पोलिसांच्या ताब्यात…

दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न…

भीषण दुर्घटना! नेपाळमध्ये विमान कोसळून 19 जणांचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!