
अभिनेता गोविंदा गोळीबार प्रकरणात पोलिसांना वेगळाच संशय…
मुंबई : बंदूक साफ करत असताना अभिनेता गोविंदाच्या पायाला चुकून गोळी लागली असून, क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. परंतु, गोविंदाला लागलेल्या गोळीवर मात्र पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
बंदूक साफ करत असताना गोविंदाला गोळी लागल्याच्या घटनेवर पोलिसांना विश्वास बसत नाही. पोलीस गोविंदाच्या मताशी सहमत नाहीत. याप्रकरणी पोलिसांनी गोविंदाच्या लेकीचा जवाब नोंदवला आहे. गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिस पुन्हा एकदा माहिती जाणून घेणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गोविंदावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, ‘गोविंदाची तब्बेत सध्या पहिल्यापेक्षा चांगली आहे. त्याला 8-10 टाके पडले आहेत. पुढच्या दोन दिवसांमध्ये डिस्चार्ज करण्यात येईल. हे टाके गुडघ्याच्या दोन इंच खाली लागले आहेत. त्यामुळे पायावर जास्त जोर टाकता येणार नाही.’
गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘अभिनेता ठीक आहे आणि काही महिन्यांत तो पुन्हा डान्स करायला सुरुवात करेल. त्यामुळे आता अभिनेता एकदम ठीक आहे आणि डिस्चार्ज होईल.’
अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी; उपचार सुरू…
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने घेतला घटस्फोटाचा निर्णय…
अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांची आत्महत्या…
अभिनेत्रीचा लैंगिक छळ प्रकरणी दोन अभिनेत्यांविरोधात गुन्हा दाखल…
भाजपच्या मंत्र्याला शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी अभिनेता अटकेत…
प्रसिद्ध अभिनेत्याला खुनाच्या आरोपाखाली अटक…

