
IPL 2026 फायनलनंतर मोठी दुर्घटना! खेळाडूंनी भरलेल्या टीम बसला लागली मोठी आग…
अहमदाबाद (गुजरात): IPL फायनलनंतर गुजरात टायटन्सच्या टीमसोबत धक्कादायक घटना घडली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरून खेळाडू हॉटेलवर जात असताना गुजरात टायटन्सच्या टीमच्या बसला आग लागली. यावेळी गुजरातचे सगळे खेळाडू बसमध्येच होते. त्यानंतर खेळाडूंना तातडीने खाली उतरवण्यात आले. शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
गुजरात टायटन्सचे खेळाडू नरेंद्र मोदी स्टेडियमवरून आपल्या हॉटेलकडे जाण्यासाठी संघाच्या बसमधून प्रवास करत असताना, वाटेतच ‘शॉर्ट सर्किट’ होऊन बसला आग लागली. प्राप्त माहितीनुसार, ही परिस्थिती लक्षात येताच, खेळाडूंना तातडीने आणि सुरक्षितपणे बाहेर काढण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं गेलं अन् त्यानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात आले. खेळाडूंना त्यांच्या हॉटेलवर नेण्यासाठी पर्यायी वाहनाची व्यवस्था होईपर्यंत, त्यांना घटनास्थळीच जवळपास एक तास अडकून पडावे लागले होते.
गुजरात टायटन्सला आयपीएल फायनलमध्ये आरसीबीकडून पराभवाला सामोरं जावे लागले आहे. आरसीबीने आरामात गुजरातने दिलेला 156 धावांची रनचेस पूर्ण केला अन् गुजरातला रिकाम्या हाताने माघारी पाठवले. अशातच आता गुजरातला ट्रॉफी मिळाली नाही अन् त्यांच्या गाडीला आग लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आग लागल्यानंतर संघातील सदस्यांना जवळपास एक तास रस्त्यावरच थांबावे लागले. त्यानंतर प्रशासन आणि संघ व्यवस्थापनाने पर्यायी वाहनांची व्यवस्था केली. सर्व खेळाडूंना आणि स्टाफ सदस्यांना सुरक्षितपणे हॉटेलमध्ये पोहोचवण्यात आले.

Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
गुजरात टायटन्ससाठी ही रात्र अत्यंत वेदनादायी ठरली. एका बाजूला आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले, तर दुसऱ्या बाजूला बसला आग लागल्याने संघाच्या अडचणींमध्ये भर पडली. विशेष म्हणजे, फायनलपूर्वी संघ सततच्या प्रवासामुळेही थकलेला होता. धर्मशाला, मुल्लांपूर आणि अहमदाबाद असा व्यस्त दौरा, तसेच खराब हवामानामुळे झालेला विलंब यामुळे खेळाडूंवर अतिरिक्त ताण निर्माण झाला होता.
दरम्यान, बसला आग लागण्याचे प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केला असून घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे. मात्र, या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व खेळाडू आणि स्टाफ सुरक्षित आहे.
ગુજરાત ટાઈટન્સનો દિવસ જ ખરાબ રહ્યો !!!
IPL ની ફાઈનલ મેચ હાર્યા બાદ હોટલ જતી વખતે બસમાં શોર્ટ સર્કિટ થયુ અને ખેલાડીઓને રસ્તા પર ઉભા રહેવાનો વારો આવ્યો. pic.twitter.com/NufvQBQLO7
— Kamit Solanki (@KamitSolanki) June 1, 2026
भारतीय क्रिकेटपटूचा मैदानातच हृदयविकाराने मृत्यू…
क्रिकेटपटूची बहिण आणि मेव्हण्याचा फायनलसाठी येताना झाला अपघतात मृत्यू अन् चिमुकले…
हृदयद्रावक! बार्शीत क्रिकेटचा पीच तयार करताना रोल गेला अंगावरून…
रत्नागिरीच्या क्रिकेटपटूचा रन काढताना हृदयविकाराने मृत्यू…
क्रिकेटपटूने दोन खणखणीत चौकार मारले अन् घेतला जगाचा निरोप…

