पुणे हादरलं! प्रेयसीनंच फिल्मी स्टाईलने केलं प्रियकराचं अपहरण; कारण…

पुणे: एका युवतीने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका युवकाचे लग्नासाठी भररस्त्यातून फिल्मी स्टाईलने अपहरण केले. संबंधित प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांनी थेट बीड जिल्हा गाठून युवतीसह तिच्या ७ साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिस चौकशीदरम्यान उघड झाले की, आरोपी युवती आणि नीलेश यांची आधीपासून मैत्री होती. तिची नीलेशसोबत लग्न करण्याची तीव्र इच्छा होती, मात्र नीलेश या लग्नासाठी तयार होत नव्हता. अखेर तो ऐकत नाही हे पाहून या युवतीने आपल्या ७ साथीदारांना गोळा केले आणि नीलेशचे अपहरण करून त्याच्याशी बळजबरीने लग्न करण्याचा कट रचला. हा सर्व प्रकार पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ घडला. फिर्यादी अजय लक्ष्मण बोद्रे (रा. शिंदेवाडी, ता. हवेली) यांनी याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली आहे. २७ मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अजय यांचा भाऊ नीलेश बोद्रे याला काही जणांनी रस्त्यात अडवले. त्याला बेदम मारहाण करत एका भाड्याच्या टुरिस्ट मोटारीत बळजबरीने कोंडले आणि तिथून सुसाट वेगाने पसार झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती मिळताच लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त संजय दराडे आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेसह लोणीकंद पोलिसांची ५ पथके तातडीने रवाना करण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजवरून त्या टुरिस्ट गाडीचा क्रमांक मिळवला. ती गाडी येवलेवाडीतील एका व्यक्तीची होती. येवलेवाडीचे वरिष्ठ निरीक्षक मारुती पाटील यांच्या मदतीने पोलिसांनी गाडीच्या चालकाचा मोबाईल नंबर मिळवला आणि आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. अखेर आरोपी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे पोहोचले असता, पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिथे धाड टाकून नीलेश बोद्रे याची सुखरूप सुटका केली.

पोलिसांनी या प्रकरणात युवतीसह सात आरोपींना अटक करून कोर्टात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. सुदाम माणिक ताठे (वय २३, रा. परभणी), शेख सोहेल शेख अफसर (वय २१, रा. परभणी), देविदास भगवान पांजगे (वय २१, रा. परभणी), वैभव मिलिंद शेळके (वय २२, रा. परभणी), प्रसाद बंडू गवळी (वय २७, रा. परभणी), सारंग भगवानराव काकडे (मोटारचालक, वय ३३, रा. नांदेड) आणि मुख्य आरोपी तरुणी (वय २७, रा. परभणी) अशी त्यांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

रिलस्टार रोहिणी पाराध्ये हिने आयुष्य का संपवलं? कारण आलं समोर…

पुणे शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये तिघांना लाखो रुपयांचा गंडा…

सावत्र आई अन् मुलाच्या अनैतिक संबंधांचा झाला थरारक शेवट…

पंढरपूर! युवतीवर लैंगिक अत्याचार; पीडितेनं ॲसिड पिऊन संपवलं जीवन…

मॉडेल त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; पोलिसांचा मोठा निर्णय…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!