मराठमोळा बाईकर! जगभ्रमंतीच्या स्वप्नांना इंग्लंडमध्ये मिळाला ब्रेक…

लंडन : 1 मे रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भायंदर येथून योगेश आलेकरी (वय ३२) यांच्या 25 हजार किलोमीटरच्या ऐतिहासिक बाईक प्रवासाला अनपेक्षित अडथळा आला आहे. दुचाकी चोरीला गेल्यामुळे जगभ्रमंतीच्या स्वप्नांना इंग्लंडमध्ये ब्रेक मिळाला आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!

योगेश आलेकरी हे भारत, नेपाळ, चीन, कझाकिस्तान, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, रशिया, लाटविया, एस्टोनिया, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स, फ्रान्स आणि इंग्लंड अशा तब्बल 17 देशांतून प्रवास करत स्कॉटलंडच्या मार्गावर पोहोचले होते. नॉटिंघॅममधील Wollaton Park परिसरातून त्यांची दुचाकीची चोरी झाली आहे. यामुळे त्यांच्या पुढील प्रवासाला ब्रेक लागला आहे. इंग्लंड पोलिसांकडून म्हणावे तसे सहकार्य मिळाले नाही, अशी खंत योगेश आलेकरी यांनी बोलून दाखवली आहे.

योगेश आलेकरी यांनी नॉटिंघॅममधील Wollaton Park परिसरात “पे अँड पार्क” मध्ये दुचाकी पार्क करून नाश्ता करत होते. नाश्ता करून परत दुचाकीजवळ गेले असता दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले. शिवाय, दुचाकीबरोबरच प्रवासातील सर्व साहित्य देखील चोरीला गेले आहे. त्यामुळे, त्यांचा हा ऐतिहासिक प्रवास अचानक थांबला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. लवकरात लवकर आपली दुचाकी मिळावी यासाठी त्यांनी मदतीची विनंती केली आहे. भारतीय दूतावासाने तात्काळ सहकार्य करत नवीन पासपोर्ट उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर परदेशातील अनेक भारतीय नागरिकांतर्फेही आलेकरी यांना मोठी मदत केली जात आहे. मात्र, बाईक चोरीच्या धक्क्यामुळे 25 हजार किलोमीटरचा हा प्रवास सध्या थांबला आहे.

दरम्यान, योगेश आलेकरी या अनुभवी बाइकरने मुंबई ते लंडन असा थरारक प्रवास करण्याची आपली योजना सुरू केली होती. हा प्रवास 25,000 किलोमीटरचा असून 100 दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्याची त्यांची योजना आहे, 1 मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून तो या प्रवासाला सुरुवातही झाली. या दौऱ्यासाठी 30 लाख रुपये खर्च येईल, असा अंदाज योगेश आलेकरी यांनी वर्तविला होता.

मुंबई! लंडनहून मुंबईत आल्यानंतर एअर होस्टेसवर अत्याचार…

अहमदाबाद ते लंडन विमानातील कुटुंबाचा सेल्फी ठरला शेवटचा…

लंडनमध्ये भारतीय युवतीची चाकूने भोसकून हत्या…

असा आहे पोलिस दलाचा इतिहास…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!