पुणे शहरात लक्ष्मीनगर पोलिसांकडून दारूभट्ट्या चालवणाऱ्या महिलांसाठी प्रशिक्षण मेळावा…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील लक्ष्मीनगर पोलिस ठाण्याच्या पुढाकारातून येरवडा परिसरातील गावठी दारूभट्ट्या चालवणाऱ्या ज्येष्ठ महिला व विधवा महिलांसाठी रोजगार निर्मिती आणि स्वावलंबनाच्या उद्देशाने विशेष माहिती व प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पुणे शहराचे पोलिस आयुक्त, सह पोलिस आयुक्त तसेच अप्पर पोलिस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) यांनी लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस उप आयुक्त चिलुमुला रजनिकांत (परिमंडळ ४) आणि सह पोलिस आयुक्त सुनिल जैतापुरकर (येरवडा विभाग) यांनीही आवश्यक मार्गदर्शन केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

येरवडा परिसरात ब्रिटिशकालापासून गावठी दारू गाळणे, तयार करणे आणि विक्री करण्याचे अवैध व्यवसाय पिढ्यानपिढ्या सुरू होते. मात्र लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन स्थापन झाल्यापासून गेल्या चार महिन्यांत पोलिसांनी मोठी मोहीम राबवत हद्दीतील तब्बल ५० ते ५५ गावठी दारू हातभट्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या आहेत. या कारवाईनंतर संबंधित महिलांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्याचा उपक्रम लक्ष्मीनगर पोलिसांनी हाती घेतला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र कदम यांच्या संकल्पनेतून २९ मे रोजी दुपारी ४ वाजता लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन येथे या प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, भुमाता ब्रिगेड संघटना, तसेच सितारा महिला विकास संस्था यांच्या प्रतिनिधींनी महिलांना विविध गृहउद्योगांचे प्रात्यक्षिक दाखवले. या कार्यक्रमासाठी पोलिस ठाणे हद्दीतील सुमारे २०० महिला उपस्थित होत्या.

उपस्थित महिलांना उदबत्ती बनविणे, पापड तयार करणे, चपाती निर्मिती, कापूर बनविणे याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि सविस्तर माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे, महिलांनी तयार केलेल्या वस्तू संबंधित संस्था स्वतः खरेदी करून घेणार असून त्यामुळे प्रत्येक महिलेला दररोज ४०० ते ५०० रुपये उत्पन्न मिळू शकणार आहे. या गृहउद्योग प्रशिक्षणामुळे लक्ष्मीनगर परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विधवा महिलांना रोजगाराची नवी दिशा मिळणार आहे. त्याचबरोबर महिलांना अवैध दारू व्यवसायापासून दूर करून स्वावलंबनाकडे नेण्याचे प्रभावी माध्यम म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, कार्यक्रमावेळी लक्ष्मीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र कदम, पोलिस निरीक्षक (गुन्हे) उमेश गित्ते, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई तसेच इतर मान्यवरांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करून स्वावलंबनाचा संदेश दिला.

पुणे! विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, 9 पोलिस अधिकारी निलंबित, पाहा नावे…

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा बळी; भावाच्या मृत्यूचा धक्का…

पोलिस निरीक्षक रविंद्र कदम यांच्या शिरपेचात मानाचा तुरा; पुरस्काराने सन्मानित…

पुणे शहरात १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू; पाहा नियमावली…

महाराष्ट्र पोलिस दलात मोठा फेरबदल; अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!