पुणे! विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, 9 पोलिस अधिकारी निलंबित, पाहा नावे…

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या विषारी दारू विक्री प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल आणि पर्यवेक्षणाचा अभाव असल्याचा ठपका ठेवत एकूण 4 पोलिस अधिकारी आणि 4 पोलिस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. या धडक कारवाईमुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हडपसर पोलिस ठाण्यातील 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई…
पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारानंतर त्यांनी तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे…

१) संजय मोगले (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस स्टेशन, पुणे शहर)
२) हसिना शिकलगार (सहाय्यक पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस चौकी, पुणे शहर)
३) हसन मुलाणी (पोलिस उपनिरीक्षक, गुन्हे शोध पथक, हडपसर पोलिस स्टेशन, पुणे शहर)
या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात आणि हद्दीत अवैध व विषारी दारूची विक्री सुरू असताना त्यावर योग्य ती कारवाई न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पिंपरी-चिंचवडमधील दापोडी पोलिस चौकीतील 6 जण निलंबित…
पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनीही दापोडी पोलिस चौकीशी संबंधित 2 अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे…
१) विजय वाघमारे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दापोडी पोलिस ठाणे)
२) राजू भास्कर (फौजदार तथा तपास पथक प्रमुख)
३) जयदीप सोनवणे (पोलिस कर्मचारी)
४) नवनाथ पोटे (पोलिस कर्मचारी)
५) सागर जाधव (पोलिस कर्मचारी)
६) विशाल काळे (पोलिस कर्मचारी)

मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटना पोलिसांचा निष्काळजीपणा आणि वरिष्ठ पातळीवरील पर्यवेक्षणाच्या अभावामुळे घडल्याचे समोर आले आहे. विषारी दारूच्या या गंभीर प्रकरणाच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्या होत्या. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिस दलाची प्रतिमा कमालीची मलिन झाली. तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पोलिस दलाची जनमानसातील विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी आणि अशा बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालणाऱ्यांना कडक संदेश देण्यासाठी दोन्ही पोलिस आयुक्तांनी ही निलंबनाची कायदेशीर कारवाई केल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा बळी; भावाच्या मृत्यूचा धक्का…

पुणे! लाच प्रकरणातील API वैशाली तोटेवार निलंबित…

पुणे! आयटी क्षेत्रातील युवक-युवतीला पकडणारे तिघं पोलिस निलंबित…

पुणे! ‘रील स्टार’ महिला पोलिसासह तिघांवर गुन्हा दाखल, पोलिस दलात खळबळ…

पुणे पोलिस दलात एकच खळबळ! 32 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!