नाशिकमध्ये सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळालं भलं मोठं घबाड….
नाशिक : नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरातील सुराणा ज्वेलर्सवर प्राप्तिकर विभागाने धाड टाकून ३० तास शोध मोहिम राबविली. यानंतर ज्वेलर्समधून तब्बल २६ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. ९० कोटींच्या संपत्तीचे कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. नागपूर आणि जळगावमधील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ही कारवाई केली आहे. जप्त केलेली रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना १४ तासांचा वेळ लागला. महाराष्ट्रात […]
अधिक वाचा...पुणे शहरात पोर्शेने दोघांना चिरडले तिथंच निबंध लेखन स्पर्धा; विषय पाहा…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन धनिक पुत्राने महागड्या पोर्शे मोटारीखाली दोघांना चिरडल्याची घटना घडल्यापासून संताप व्यक्त केला जात आहे. बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याच्या आणि आरटीओसोबत वाहतूक नियंत्रण करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला गेला होता. पुण्यात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी अपघातस्थळीच निबंध स्पर्धेचे आयोजन केले. माझा बाप बिल्डर असता तर…, अश्विनी आणि अनिशचे […]
अधिक वाचा...पुणे अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर…
पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर येथे पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी धनाढ्य अगरवाल कुटुंबाकडून विविध मार्गांचा अवलंब केला जात असल्याचे उघड झाले आहे. अगरवाल कुटुंबातील विशाल अगरवाल आणि सुरेंद्रकुमार अगरवाल यांनी याप्रकरणात चालकावर खोटी जबानी देण्यासाठी दबाव आणल्याची माहिती समोर आली आहे. गंगाराम पुजारी असे या चालकाचे नाव असून त्याने पोलिसांना सगळा प्रकार सांगितला […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात चार मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील एका शेततळ्यामध्ये शुक्रवारी (ता. २४) दुपारच्या सुमारास चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राधिका नितीन केदारी (वय 14, राहणार कानेवाडी ता. खेड), श्रद्धा काळू नवले (वय वर्ष 13), सायली काळू नवले (वय 11वर्ष), […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू…
सातारा : कराड तालुक्यातील गोवारे गावामध्ये असलेल्या विहिरीजवळ असलेल्या फ्युजबॉक्सचा शॉक लागून तुकाराम सदाशिव खोचरे (वय 55) व शहाजी सदाशिव खोचरे (वय 50) या दोन सख्ख्या भावांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तुकाराम आणि शहाजी खोचरे यांची गावच्या भटकी नावाच्या शिवारात शेती आहे. याठिकाणीच त्यांची विहीर होती. या […]
अधिक वाचा...पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबले…
पुणेः पुणे शहारतील कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा मुलगा विशाल अगरवाल हा देखील पोलिस कोठडीत आहे, तर अल्पवयीन आरोपी बालसुधार गृहात आहे. सर्वात प्रथम वडिल, मग नातू आणि आता आजोबा अशा तिघांनाही अटक झाली आहे. पोर्शे कारच्या ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याने हा गुन्हा […]
अधिक वाचा...लग्न लावून देत नसल्याने दोन भावांनी बापाला कायमचं संपवलं…
छत्रपती संभाजीनगर : वडील लग्न करुन देत नाहीत म्हणून दोन मुलांनी बापावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना वडगाव कोल्हाटी येथे घडली. या घटनेत संपत वाहूळ (वय ४८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोपट वाहूळ आणि प्रकाश वाहूळ या दोघांना वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, […]
अधिक वाचा...पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…
पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर येथे धनिकपुत्राने आपल्या कारच्या धडकेत अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. राहुल गांधी यांनीही व्हीडिओ शेअर करुन पुणे अपघातप्रकरणातील पोलिसांच्या कारवाईविषयी प्रश्न उपस्थित केले होते. या घटनेनंतर जयंत पाटील यांचा भाचा आणि शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे […]
अधिक वाचा...उजनी धरणात बोट उलटल्याने पाच जण बुडाले…
सोलापूर: उजनी धरणात प्रवासी वाहतूक करणारी बोट उलटल्याने पाच जण बुडाले असून, त्यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे. धरणात बुडालेल्या सहा जणांचा शोध घेण्याकरिता रात्रभर शोधकार्य सुरू राहिले. सलग दुसऱ्या दिवशी आज शोधकार्य सुरू आहे. बोटीत राहुल डोंगरे हे पोलिस उपनिरीक्षक होते. त्यांनी बोट उलटल्यानंतर धाडसाने पोहत धरणाचा काठ गाठून जीव वाचवला. बोटमधील वाचलेल्या तरुण पोलिस […]
अधिक वाचा...पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…
पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात पोर्शे गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी मृतांचे नावे आहेत. संबंधित घटना घडल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. धक्कादायक म्हणजे मोटारीला नंबर नसलेल्या आणि तीन कोटी रुपये किंमत असलेल्या पोर्शे सारख्या भरधाव गाडीने आणि पुण्यातील प्रसिद्ध […]
अधिक वाचा...
