Video: मुंबईत इमारतीला भीषण आग; दोन जणांचा होरपळून मृत्यू…

मुंबई : कांदिवली महावीरनगर येथील वीणा संतूर बिल्डिंगमध्ये लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका आठ वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप समोर आले आहे.

कांदिवली येथील वीणा संतूर इमारतीला आज (सोमवार) दुपारी 12 चा सुमारास आग लागली होती. इमारतीच्या ग्राउंड प्लस पहिल्या मजल्यावर ही आग लागली. लेवल एक प्रकारची असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली. या आगीत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे.

दुर्देवाने या आगीत ग्लोरी (वय 43), जोसू रॉबर्ट (वय 8) या दोघांचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मी बुरा (वय 40), राजेश्वरी भरतारे (वय 24), रंजन शाह (वय 76) हे जखमी झाले आहेत. जखमींवर सरकारतर्फे उपचार करण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग; सात जणांचा होरपळून मृत्यू…

मुंबईत एअर होस्टेस गळा चिरून हत्या; एकाला अटक…

Video: मुंबईतील महिलेचे श्वानासोबत धक्कादायक कृत्य…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!