पुणे शहरात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती; अनेक गाड्यांना उडवले…

पुणे : कारचालकाशी झालेल्या वादातून पीएमपी चालकाने बेदरकारपणे वाहनांना धडक दिल्याची घटना सेनापती बापट रस्त्यावर घडली. बसने धडक दिल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी पीएमपी चालकास अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

नीलेश ज्ञानेश्वर सावंत (वय 31, रा. अतुलनगर, वारजे) असे अटक करण्यात आलेल्या बस चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिस कर्मचारी सुशील लोखंडे यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपी चालक नीलेश सावंत आज (रविवार) दुपारी एकच्या सुमारास सेनापती बापट रस्त्यावरून विद्यापीठ चौकाकडे निघाला होता. त्यावेळी जे. डब्ल्यू. मेरिएट हॉटेलसमोर पीएमपी चालक सावंत याचा एका कारचालकाशी वाद झाला. कारचालकाने पीएमपी चालक सावंत याला थांबविण्याचा प्रयत्न केला. सावंतने बस पुढे नेली. कारचालक बसच्या मागे होता. सावंतने काही कळायच्या आत बस मागे नेली. कारला बसने धडक दिली. अचानक बस भरधाव वेगाने मागे नेण्यात आल्याने पीएमपी प्रवाशांमध्ये घबराट उडाली. रस्त्यात आलेल्या दहा ते पंधरा गाड्यांना त्याने उडवले. तो गाडी चालवत असताना बसमध्ये तब्बल 50 प्रवाशी होते. पीएमपी प्रवाशांनी आरडाओरडा केला. नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी बसचालक सावंतला बस थांबविण्यास सांगितले.<

सावंत बस घेऊन पसार झाला. काही अंतरावर त्याला नागरिकांनी पकडले. पीएमपी चालक सावंतने दारू प्याल्याचे तपासणीत उघडकीस आले आहे. पीएमपी बस पुणे विद्यापीठमार्गे पिंपरी-चिंचवडकडे निघाली होती. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही. या घटनेमुळे सेनापती बापट रस्त्यावर गोंधळ उडाला होता. बसचालका विरोधात चतुशृंगी पोलिस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, निलेश सावंत याने केलेल्या प्रकारामुळे पुणे शहरात 2012 मध्ये घडलेल्या संतोष माने प्रकरणाची आठवण ताजी झाली. संतोष माने याने दारुच्या नशेत 25 जानेवारी 2012 मध्ये स्वारगेट स्थानकातून पीएमटीची बस काढली. त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक जण जखमी झाले होते. संतोष माने याला या प्रकरणात फाशीची शिक्षा झाली होती.

हिट अँड रन! पुणे शहरातील झेड ब्रिजजवळ अनेक वाहनांना उडवले; एकाचा मृत्यू…

नवले पुलावर ट्रकला भीषण अपघात; चार जणांचा होरपळून मृत्यू…

हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…

पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

पुणे-नगर महामार्गावर PMPMLच्या दोन बस समोरासमोर धडकल्या; प्रवासी जखमी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!