हृदयद्रावक! आईच्या मृतदेहाला चिकटून रात्रभर रडत राहिला चिमुकला…
चंद्रपूर : बामणी-राजुरा रस्त्यावरील वर्धा नदीवरील पुलावरून महिला आपल्या चार वर्षाच्या चिमुकल्यासह स्कूटरवरून जात असताना तोल गेला आणि महिला स्कूटर आणि मुलासह 30 फूट खाली पडली. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी चार वर्षांचा मुलगा रात्रभर आईच्या मृतदेहाला चिकटून रडत राहिल्याची हृदद्रावक घटना समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
महिला घरी न पोहचल्याने कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. बुधवारी रात्रभर पोलिसांनी शोधमोहीम राबवली. गुरुवारी सकाळी वर्धा नदीच्या काठावरील पुलाखाली महिलेचा मृतदेह आणि चार वर्षाचा मुलगाही जखमी अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि जखमी मुलालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
आदित्य प्लाझा बामणी येथे राहणारी सुषमा पवन काकडे या आपल्या चार वर्षांच्या मुलासाठी चॉकलेट आणण्याचे सांगून स्कूटरवरून बाहेर पडल्या होत्या. सुषमा या तीन महिन्यांच्या गर्भवती होत्या. बामणीहून राजुरा येथे जात असताना स्कूटरचा तोल गेला आणि स्कूटरवरून वर्धा नदीवरील पुलावरून 30 फूट खाली पडल्या. यावेळी गंभीर जखमी झालेल्या सुषमा यांचा जागीच मृत्यू झाला. अंधारामुळे त्यांच्याकडे कोणाचे लक्षही गेले नाही. सुषमा यांचा मुलगाही गंभीर जखमी झाला होता. सुषमा घरी न परतल्याने तिचे कुटुंबीय शोध घेत होते. शिवाय, मोबाईल लागत नव्हता.
बल्लारपूर पोलिसांनी सांगितले की, बुधवार-गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात महिला व बालक बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. सुषमा यांचे पती पवन काकडे हे बँकेत कर्मचारी आहेत. पत्नी सुषमा मुलासाठी चॉकलेट आणून देवीच्या दर्शनासाठी बामणी गावात जाण्यास सांगून घरातून निघून गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सुषमा यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन वर्धा नदीजवळ बामणी राजुरा मार्गावर दाखवत होते. पहाटे चारच्या सुमारास पोलिस पथकासह कुटुंबीय वर्धा नदीवर पोहोचले. चौकशी केली पण काही माहिती मिळाली नाही. पोलिसांनी सखोल शोधमोहीम राबवली. यावेळी पुलाखालून एका मुलाच्या रडण्याचा आवाज आला. जवळ जाऊन पाहिले असता नदीच्या काठावर सुषमा यांचा मृतदेह पडलेला दिसला. आईच्या मृतदेहाशेजारी चार वर्षाचा मुलगा रडत होता. त्यालाही दुखापत झाली होती. सुषमा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…
हृदयद्रावक! दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा बुडून मृत्यू…
हृदयद्रावक! माहेरवरून परतताना आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू…
हृदयद्रावक Video: वडिलांच्या मिठीतच सोडला प्राण…
हृदयद्रावक! आईने नऊ महिन्यांच्या चिमुकलीला दिला गळफास अन्…
हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!