पुणे शहरात खंडणीसाठी डांबून ठेवलेल्या वृध्द महिलेची केली सुटका…

पुणे (संदीप कद्रे): अपहरण करून खंडणीसाठी डांबून ठेवलेल्या वृध्द महिला व तिच्या सहकारीचे खंडणी विरोधी पथक -2 ने सुटका करून सराईत गुन्हेगार आरोपींना ताब्यात घेतले आहे. खंडणी विरोधी पथक 2 गुन्हे शाखाचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

खंडणी विरोधी पथक कडील अधिकारी व अमलदार गुन्हे प्रतिबंध अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोना /शंकर संपते यांना माहिती मिळाली की, वैभव भास्कर पोखरे यांची आई मीनाक्षी पोखरे व मनीषा पवार यांना कुख्यात गुंड बाबुलाल मोहोळ व त्याचे साथीदारांनीं महिला मीनाक्षी पोखरे व मनीषा पवार यांनी पुणे स्टेशन येथील स्टॅाल मिळवून दिले नाहीत म्हणून 6 लाखाचा तोटा झाला असे सांगून अपहरण करून डांबून ठेवून त्यांना मारहाण करत आहेत.

आरोपींनीं वैभव भास्कर पोखरे यांच्या आई ला जीवे मारण्याची धमकी देऊन 17 लाख रुपये ची खंडणी ची मागणी केली होती. प्राप्त माहिती वरुन कारवाई करणे कामी खंडणी विरोधी पथक कडील अधिकारी व अमलदारांनी माहितीचे विश्लेषण करून उत्तमनगर येथून नमूद महिलांना डांबून ठेवलेले ठिकाणचा शोध घेऊन
1) बाबुलाल लक्ष्मण मोहोळ वय 45,वर्षे सरडे बाग उत्तमनगर पुणे
2) अमर नंदकुमार मोहिते वय 39 वर्षे गणेश नगर पुणे
3) प्रदीप प्रभाकर नलवडे, 38 ,भूगाव ,पुणे
4)अ क्षय मारूती फड, 24 रा. वारजे यांना ताब्यात घेऊन महिलांची सुटका केली. नमूद बाबत उत्तमनगर पो स्टे येथे ipc 364(अ), 385, 387,341 323 504 506,34 नुसार गुन्हा दाखल करणेची कार्यवाही करीत आहोत.

नमूद आरोपी क्र. 1) बाबुलाल लक्ष्मण मोहोळ वय 45,वर्षे सरडे बाग उत्तमनगर पुणे याच्यावर 10 गुन्हे नोंद आहेत. 2) अमर नंदकुमार मोहिते वय 39 वर्षे गणेश नगर पुणे याचेवर 5 गुन्हे नोंद आहेत. 3) आरोपी क्र. 3) प्रदीप प्रभाकर नलवडे याचेवर 2 गुन्हे नोंद आहेत.

सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहा पोलिस आयुक्त गुन्हे सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक 2 गुन्हे शाखा चे पोनि प्रताप मानकर, पोउपनि श्रीकांत चव्हाण,सहा फौ विजय गुरव, पोलिस अमंलदार प्रदिप शितोळ, विनोद साळुंखे, सुरेंद्र जगदाळे, राहुल उत्तरकर, शंकर संपते, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, चेतन आपटे, पवन भोसले, चेतन शिरोळकर, महिला पोलिस अंमलदार आशा कोळेकर यांनी केली आहे.

पुणे शहरात माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणा-या विरोधात प्रथमच मोक्का अंतर्गत कारवाई…

पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…

कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी चिटकून खंडणी मागणाऱ्यास Unit-2ने केले जेरबंद…

अल्पवयीन मुलाचे अपहरण करून ३० लाखांची मागणी; अडीच तासात ताब्यात…

कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी

प्रताप मानकर: खेळ आणि वैचारीक खुराकाची सांगड घालणारा अधिकारी!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!