
पुणे पोलिस पाल्यांकरीता क्रिकेट प्रशिक्षण शिबीराचे आयोजन!
पुणे (संदीप कद्रे): सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य, पुणे शहर यांच्यावतीने पोलिस पाल्यांकरीता क्रिकेट प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांना सहभाग नोंदवला होता, अशी माहिती अध्यक्ष भानुप्रताप बर्गे यांनी दिली.
सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य, पुणे ही संघटना सेवानिवृत पोलिस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुंटुबाच्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी सन २०१९ रोजीपासून कार्यरत आहे. चालू वर्षापासून सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य, पुणे शहर मार्फत पोलिस पाल्यांचा क्रिकेटचा संघ तयार करून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) मध्ये खेळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच पोलिस पाल्य भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळावेत यासाठी पोलिस पाल्यांचा संघ तयार करण्याचे उद्दिष्ठ आहे.
पोलिसांच्या पाल्यांसाठी सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य, पुणे शहर यांचे मार्फतीने १६/१२/२०२३ व १७/१२/२०२३ या दिवशी सकाळी ०६:३० ते ०८:३० वाजेपर्यंत कटारीया हायस्कुल, महर्षी नगर, स्वारगेट येथे क्रिकेट प्रशिक्षण शिबीराचे आयेजन करण्यात आले होते. आयोजित क्रिकेट प्रशिक्षण शिबीरामध्ये पोलिसांच्या पाल्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. क्रिकेट प्रशिक्षण शिबीरादरम्यान दि पूना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान पोलिसकाकांना भोजन व अल्पोपहार!
पुणे पोलिस व कुटुंबीयांसाठी केअर संस्थेमार्फत सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

