विद्यार्थ्याने फीसाठी पैसे नसल्याने केली आत्महत्या; चिठ्ठीत लिहीले की…

नांदेड : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शिक्षणासाठी फी भरण्याची ऐपत नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या करत असल्याची चिट्ठी लिहून विहीरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओमकार बावणे (वय १७, रा. भोपळा, ता. नायगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी दोन बळी गेले आहेत. शनिवारी पहाटे हदगाव तालुक्यातील वडगाव येथील शुभम पवार (वय २४) याने विष पिऊन आत्महत्या केली होती. रविवारी रात्री शुभमच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले. शुभमच्या चितेची आग थंड होण्यापूर्वी आणखी एकाने नांदेडमध्ये आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील भोपळा येथे एका शालेय विद्यार्थ्यांने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

ओमकार याने आत्महत्या करण्यापूर्वी विहिरीवर लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये माझे आई वडील मोल मजुरी करून आम्हाला शिक्षण शिकवत होते. पण त्यांची परिस्थिती मला पाहवत नव्हती. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी विहिरीत उडी मारून जीव देत आहे, असे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

विनायक मेटे यांच्या पुतण्याची गळफास घेऊन आत्महत्या…

नवविवाहितेने हाताच्या तळव्यावर कारण लिहून केली आत्महत्या…

पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…

पोलिसकाकाची घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…

लेखक राजन खान यांच्या मुलाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहीले की…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!