प्रेमविवाहानंतर नवऱ्यासह पाच जणांचा काढला काटा; गूढ उकलले…

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील महागावमध्ये १५ दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे गूढ उकलले असून सुनेनेच त्यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

प्रेमविवाहानंतर नवऱ्याच्या आई वडिलांचा, बहिणीचा आणि मावशीचा खून करण्यात आला. याप्रकरणी संघमित्रा कुंभारे आणि रोझा रामटेके यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांना दिली.

संघमित्रा हिने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन डिसेंबर २०२२ मध्ये रोशन कुंभारे सोबत लग्न केले होते. त्यानंतर संघमित्राच्या वडिलांनी आत्महत्या केली. विवाहानंतर पतीसह सासरच्यांकडून संघमित्राचा छळ केला जात होता. यामुळेच तिने काटा काढायचे ठरवले. दुसरी आरोपी रोझा रामटेके ही संघमित्राची मामेसासू आहे. रोशनची आई विजया कुंभारे आणि तिच्या इतर बहिणी या रोझाच्या वडिलांच्या संपत्तीत वाटणी मागत होत्या. त्यावरून नेहमी वाद सुरू होते. यामधूनच संघमित्रा आणि रोझा यांनी मिळून पाच जणांना मारण्याचा कट रचला.

संघमित्रा आणि रोझा यांनी सुरुवातीला धोतरा या विषारी वनस्पतीचा वापर करून विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, धोतऱ्याचा वापर केल्यास अन्न आणि पाण्याचा रंग बदलत असल्याचे त्यांना समजले. पुढे दोघींनी इंटरनेटची मदत घेत विषाबद्दल माहिती मिळवली. त्यांनी रंग, चव न बदलणारे विष शोधले. तसेच हे विष शरिरात गेल्यानंतर चार ते पाच दिवसांनी याचा परिणाम होत असल्याचे समजले.

रोझा हिने तेलंगणा राज्यातून विष आणले. जेव्हा संधी मिळेल तेव्हा जेवणात हे विष मिसळले. संघमित्राचे सासू सासरे सुरुवातीला आजारी पडले. दोघेही २६ आणि २७ सप्टेंबर रोजी मृत्यूमुखी पडले. संघमित्राची नणंद कोमल दहागावकरचा ८ ऑक्टोबरला मृत्यू झाला. मावशी आनंदा उंदीरवाडे यांचा १४ ऑक्टोबरला आणि संघमित्राचा पती रोशन कुंभारेचा १५ ऑक्टोबरला मृत्यू झाला. सध्या आणखी तिघांवर उपचार सुरू आहेत. यात रोशनच्या आई वडिलांना दवाखान्यात नेणारा वाहनचालक राकेश मडावी, रोशनचा मावसभाऊ बंटी आणि रोशनचा भाऊ राहुल यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

भीषण अपघात! रिक्षावर ट्रक उलटून चार जणांचा जागीच मृत्यू…

ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे तिघांना गमवाला लागला जीव…

वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…

एकतर्फी प्रेमातून युवतीवर बलात्कार करून केला खून अन् मृतदेह…

प्रेमसंबंध तोडले, स्टॅम्पवर लिहून घेतलं तरी पहाटेच्या सुमारास…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!