
नाशिक दुहेरी हत्याकांडाने हादरले! पतीने पत्नी, मुलाचा चिरला गळा अन्…
नाशिक : नाशिकरोड परिसरातील जेलरोड भागात एका पतीने आपल्या पत्नीचा आणि चिमुकल्या मुलाचा अत्यंत निर्घृणपणे खून करून स्वतःही विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले आहे.
कौटुंबिक किंवा अन्य कारणांवरून पतीने टोकाचे पाऊल उचलत पत्नी आणि मुलावर ब्लेडसदृश धारदार चाकूने गळ्यावर प्राणघातक वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पतीने स्वतःही विषारी औषध सेवन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. घटना उघडकीस येताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
View this post on Instagram
घटनास्थळी नागरिकांनी आणि पोलिसांनी तत्काळ धाव घेत विष प्राशन केलेल्या पतीला तात्काळ नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या पतीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
पतीने आपल्याच हसतखेळत्या कुटुंबाचा असा निर्घृणपणे अंत का केला? यामागे घरगुती वाद होता, आर्थिक विवंचना होती की अन्य काही कारण? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करत पंचनामा केला आहे. या दुहेरी हत्याकांडाचा पुढील अधिक तपास नाशिकरोड पोलिस करत आहेत.
दरम्यान, इंदिरानगर परिसरातील जॉगिंग ट्रॅकवर शनिवारी पहाटे एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत संशयित तरुणाचा मृतदेह आढळून आला. तरुणीची हत्या केल्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास इंदिरानगर पोलिस करत आहेत.
नाशिक! वैष्णवी आवारे हत्येचा उलगडा; प्रियकराला दुसऱ्यासोबत लग्न जमल्याचा राग…
नाशिकमध्ये महिलेचा सुटकेसमध्ये मृतदेह; अनैतिक प्रेमसंबंधातून संपवलं…
सैराट! नाशिकमध्ये प्रेयसीचा भाऊ अन् मेव्हण्याकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या…
नाशिक! दाजीला झाला राग अनावर अन् घेतला मेव्हणीचा जीव…
नाशिक शहरातील रुग्णालयात खळबळ, स्टाफ रुममध्ये नर्सचा मृतदेह…

