Video: गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस उपायुक्तांना धक्काबुक्की…

नागपूर : पोलिस उपायुक्त राहुल मदने यांना भाजपच्या युवा शहर प्रमुखाकडून धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली आहे. धक्काबुक्कीचा व्हिडीओ खासदार संजय राऊत यांच्याकडून ट्विट केला आहे.

नागपूरचे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांना भाजपचे युवा शहराध्यक्ष पुष्कर पोशेट्टीव यांनी धक्काबुक्की केली. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. उपायुक्त पदाच्या पोलिस अधिकाऱ्याला अशाप्रकारे धक्काबुक्की कशी केली जाऊ शकते? अशी चर्चा सुरु आहे. या घटनेवरुन संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी व्हिडीओ ट्विट करताना म्हटले आहे की, ‘हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारे आहे. मुक्काम पोस्ट : नागपूर, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवगिरी निवासस्थान. पोलिस उपायुक्त राहुल मदने यांना भाजप युवा शहर प्रमूख पुष्कर पोशेट्टीव याने उघड धक्का बुक्की केली. खाकी वर्दीच्या कॉलरला हात घातला. स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्र इतका हतबल आणि लाचार कधीच झाला नव्हता.’

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या ‘गृह खात्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून त्यांच्यात खात्याच्या पोलिस अधिकाऱ्यांना अशाप्रकारे धक्काबुक्की केली जाते, मग भाजपकडून सर्वसामान्य नागरिकांवर काय अत्याचार होत असेल याचा हा पुरावा आहे. आज सकाळपासून ही बातमी दाबण्याचा प्रयत्न केला गेला आहे.’

‘अधिकाऱ्यांवर काय पद्धतीने अशी अरेरावी केली जाते, मागे शिंदे गटाच्या एका लोकप्रतिनिधीने डॉक्टरांना चक्क शौचालय साफ करायला लावले, तर आता भाजपच्या एक पदाधिकारी उपायुक्त पदाच्या अधिकाऱ्यासोबत अशी गुंडागिरी केली जात असेल तर सर्वसामान्यांवरील दादागिरी काय असेल? देवेंद्र फडणवीस वारंवार तोंडघशी पडत आहेत. ते वारंवार गृहमंत्री म्हणून कमी पडताना दिसत आहेत. याचे हे पुरावे आहेत,’ अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

पोलिस अधिकारी कपल जोडीचा प्री-वेडिंग Video Viral…

Video: शौचालय साफ करायला लावल्याप्रकरणी खासदारावर गुन्हा दाखल…

Video: पोलिसाने पळत जाऊन घातली चोरट्यांच्या दुचाकीला लाथ…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!