विनायक मेटे यांच्या पुतण्याची गळफास घेऊन आत्महत्या…

बीड : दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांचा पुतण्या सचिन त्रिंबक मेटे (वय ३४) यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सचिन यांनी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

विनायक मेटे यांचे बंधू त्रिंबक मेटे यांचा तो मुलगा असून त्याने आत्महत्या नेमकी कुठल्या कारणाने केली याचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मेटे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सचिन यांनी बीडच्या राजेगाव परिसरात आत्महत्या केली आहे. सचिन यांच्या आत्महत्येचे वृत्त समजताच शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, शिवसंग्राम या मराठा संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे मागील वर्षी 14 ऑगस्ट 2022 रोजी अपघातात निधन झाले होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांचा पहिला स्मृतीदिन झाला होता. त्यानंतर आता वर्षभरातच मेटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

विनायक मेटे यांचा पुतण्या सचिन मेटे याने अचानकपणे टोकाचे पाऊल का उचचले? याचा तपास पोलिस करत आहेत. आत्महत्या करण्यामागे काही कारणे आहेत की अन्य कारणे याची चौकशीदेखील पोलिसांकडून करण्यात येणार आहे. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.

नवविवाहितेने हाताच्या तळव्यावर कारण लिहून केली आत्महत्या…

पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…

पोलिसकाकाची घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…

युवतीची बलात्कारानंतर आत्महत्या; फरार संशयिताचा आढळला मृतदेह…

दुसऱ्या विवाहाचे फोटो ठेवले स्टेटसला, पहिल्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

लेखक राजन खान यांच्या मुलाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहीले की…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!