हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

पुणे : पुणे शहरात हिट अँड रन प्रकरणात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांवर कारवाई होणार आहे. प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर संबंधित प्रकरण चर्चेत राहिले आहे. पुणे शहरातील कल्याणीनगर भागात शनिवारी (ता. १८) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास आलिशान कारने दुचाकीसह […]

अधिक वाचा...

MPSC स्पर्धा परीक्षेत 3 गुण कमी पडल्यामुळे युवकाची आत्महत्या…

जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंत्रालय क्लार्क परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, यामध्ये अपयश आलेल्या युवकाने आत्महत्या केल्याची धक्क्दायक घटना शिरसोली येथे घडली आहे. आकाश भिमराव बारी (वय २५) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तीन गुण कमी मिळाल्याने त्याने गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त […]

अधिक वाचा...

कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश, डॉक्टरसह चौघांना अटक…

कोल्हापूर : गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या संशयावरून डॉक्टरसह तीन एजंटना करवीर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. युवराज गोविंद चव्हाण, संजय कृष्णात पाटील आणि डॉक्टर हर्षल रवींद्र परुळेकर, विजय लक्ष्मण कोळसकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विजय कोळस्कर आणि हर्षल नाईक हे डॉक्टर असल्याचं सांगत होते. चिखली परिसरात त्यांनी […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! एकमेकांना मिठी मारल्याने चौघांचा बुडून मृत्यू…

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बस्तवडेत वेदगंगा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्याला वाचवण्याच्या नादात एकमेकांना मिठी मारल्याने हा भयंकर प्रकार घडला आहे. जितेंद्र विलास लोकरे (वय 36, रा. मुरगूड ता. कागल) रेश्मा दिलीप येळमल्ले […]

अधिक वाचा...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य फरार आरोपी भिंडे याला अटक…

मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी आरोपी भावेश भिंडे याला अखेर मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या जयपूरमधून अटक केली आहे. वादळी वाऱ्यानंतर घडलेल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला. बेकायदेशीरपणे बॅनर उभारुन 17 जीवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या भावेश भिंडे याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. घाटकोपर दुर्घटनेनंतर आरोपी भावेश भिंडे बेपत्ता झाला होता. भावेश भिंडेच्या मागावर […]

अधिक वाचा...

सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानाची आत्महत्या…

जळगाव: प्रसिध्द क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षा व्यवस्थेतील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) अंगरक्षक जवानाने आज (बुधवार) पहाटे जामनेर येथील निवासस्थानी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रकाश कापडे (वय ३९) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असून, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, […]

अधिक वाचा...

उत्तर महाराष्ट्र केसरी भूषण लहामगे खून प्रकरणी नातेवाईकाला अटक…

नाशिक : उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्तीपट्टू भूषण लहामगे यांच्या खून प्रकरणी चुलते यशवंत लहामगेला ताब्यात घेतले आहे. खून प्रकरणातील मुख्य संशयित आणि इतर साथीदार अद्याप फरार असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिक-मुंबई महामार्गावर भूषण लहामगे यांचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. भरदिवसा झालेल्या या खूनाच्या घटनेने मोठी खळबळ उडाली […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आईच्या डोळ्यात देखत मुलगी आणि बहिणीचा मृत्यू…

सोलापूर : अक्कलकोट येथील म्हैसलगी जवळच असलेल्या भिमा नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये बुडालेल्या लहान मुलीची दुसरी मोठी मुलगी मावशी होती. आरती निकंबे असे मावशीचे नाव असून रुपाली माने असे मुलीचे नाव आहे. रुपालीची आई शोभा माने यांच्यासोबत दोघीही नदीवर धुणं धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी बुडून […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र हादरला! जादूटोणाच्या संशयातून दोन जणांना जाळले जीवंत…

गडचिरोली : जादूटोणाच्या संशयातून दोन जणांचा जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये संपूर्ण गाव सामील झाले होते. धक्कादायक म्हणजे, यामध्ये मृताचा नवरा आणि मुलगा सुद्धा आरोपीमध्ये सहभागी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्सेवाडा या गावामध्ये जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना काही गावकऱ्यांनी […]

अधिक वाचा...

शिक्षक आमदारच्या कुटुंबियांच्या गाडीचा भीषण अपघात; 6 ठार…

वाशिम : अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबियांच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून, अपघातात सहा जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील उड्डाण पुलाजवळील शिगर नाल्याजवळ हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त गाडीमध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!