निवृत्त कॉन्स्टेबलच्या घरावर छापा टाकला अन् मिळालं मोठं घबाड…
भोपाळ (मध्य प्रदेश): एका निवृत्त कॉन्स्टेबलच्या घरावर लोकायुक्त पोलिसांनी छापेमारी केली असता, त्याच्या घरात मोठं घबाड सापडले आहे. या कारवाईत कोट्यवधींची रोख रक्कम, मोठ्या प्रमाणात सोनं, चांदीचे दागिने आणि नोटा मोजण्याची सात मशीन मिळाली आहेत. एका निवृत्त कॉन्स्टेबलकडे एवढं मोठं घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. भोपाळमध्ये एका निवृत्त आरटीओ कॉन्स्टेबलच्या घरावर लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकला. […]
अधिक वाचा...घबाड सापडलं! चेकपोस्टवर 190000000 रुपयांची सोनं-चांदी जप्त…
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर-जळगाव रोडवर स्थिर पथकाने गुरुवारी (ता. 15) सायंकाळी सिल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर 19 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने ताब्यात घेतले आहेत. संभाजीनगर जळगाव रोडवरील निल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली होती. यावेळी 19 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले. हे दागिने जळगाव येथील एका ज्वेलर्सचे असल्याची माहिती पुढे आली आहे. […]
अधिक वाचा...मुंबईत 1 कोटी 11 लाख रुपयांचे सोन्याचे बॉल जप्त; धक्कादायक माहिती समोर…
मुंबई : मुंबईत एक कोटी ११ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे बॉल जप्त करण्यात आले आहेत. एका इलेक्ट्रिशियनकडे हे सोन्याचे बॉल सापडले असून पोलिस अधिक तपास करत आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून कोट्यवधींची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. अब्दुलकर अब्दुल मजीद (मूळ रा. चेन्नई) या इलेक्ट्रिशियनकडे गुरुवारी (ता. ७) रात्री एक कोटी ११ लाख रुपये किंमतीची […]
अधिक वाचा...दुबईवरून भारतात येताना प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं लाखो रुपयांचं सोनं; पण…
जयपूर (राजस्थान) : दुबईमधील अबुधाबीवरून भारतात आलेल्या प्रवाशाची तपासणी केली असता त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एक किलो पेक्षा जास्त सोनं लपवल्याचे समोर आले. जयपूर एअरपोर्टरवर प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. प्रवाशाचा एक्स रे काढल्यानंतर त्यात ही बाब समोर आली. यासाठी न्यायालयाची खास परवानगी पोलिसांनी काढली. जयपूर एअरपोर्टवर कस्टम विभागाने अबुधाबीहून जयपूरला आलेल्या एका प्रवाशाला सोने तस्करी […]
अधिक वाचा...पुण्यात 138 कोटी रुपये किमतीचे सोनं आलं कुठून? महत्त्वाची माहिती…
पुणे (संदिप कद्रे): राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांनी दोन कारवायांमध्ये मोठी रक्कम ताब्यात घेतली आहे. पुणे शहरातील सहकार नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटी रुपयांचे सोने पकडले आहे. सातारा रस्त्यावर आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास नाकाबंदी पोलिसांनी कोट्यवधीचे सोने जप्त केले आहे. याबाबत पुढील […]
अधिक वाचा...ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी अनेकांचे दणाणले धाबे…
नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नाशिकमधील सराफ व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर आले असून, त्यांची चौकशी होणार आहे. कारण ड्रग्जच्या पैशातून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याने नाशिकमधून सोने खरेदी केल्याचे उघडकीस आल्यानंतर संबंधित सराफ व्यावसायिकाचे धाबे दणाणले आहेत. ललित पाटील प्रकरणात नाशिकमधील सराफ व्यावसायिकाचा हात असल्याचे समोर आले असून ललित पाटीलचा […]
अधिक वाचा...