प्रकृती अस्वास्थ्यानंतरही सुटी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या; अशोक उईके यांची शाळेला भेट…
गडचिरोली: गडचिरोलीतील एका आश्रमशाळेत काही दिवसांपूर्वी साप चावल्याने तीन मुलींना जीव गमवावा लागला होता. सरकारनेही या घटनेची गांभीर्याने दखल घेत संबंधित आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांसह संचालकांवर कारवाई केली होती. आता, पुन्हा एकदा गडचिरोलीतील दुसऱ्या आश्रमशाळेतून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रकृती बरी नसल्याने एका विद्यार्थिनीला सुटी न दिल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे शिक्षण […]
अधिक वाचा...पाकिस्तानी दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान असलेले श्रीनगरमधील घर एनआयएकडून जप्त…
श्रीनगरः राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) श्रीनगरमधील हजरतबल येथील दनिहामा येथील एक निवासी मालमत्ता जप्त केली आहे. या इमारतीचा वापर पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबाच्या (एलईटी) दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी आणि गुन्हेगारी साहित्य लपवण्यासाठी केला जात होता, असा आरोप आहे. दानिहामा गावातील खसरा क्रमांक ३१५ येथे असलेली ही मालमत्ता, आरोपी गुलाम मोहम्मद मीर उर्फ मामा गॅस याची आहे. एनआयएच्या महासंचालकांच्या […]
अधिक वाचा...विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून पोलादपूरमध्ये पतीस अटक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल…
पोलादपूर: रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मुरलीधर दरेकर यांची सून गार्गी गणेश दरेकर हिने कोतवाल बुद्रुक येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलादपूर पोलिस ठाण्यात पती गणेश मुरलीधर दरेकर याच्यासह अन्य चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश दरेकर याला अटक करण्यात आली असून, महा़डच्या न्यायालयात […]
अधिक वाचा...पूर्णेकर हत्याकांडातील पाचवा हेल्मेटधारी आरोपी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीपेक्षा वेगळा – राम पूर्णेकर…
ठाणेः प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडातील पाचवा हेल्मेट घातलेला आरोपी आणि पोलिसांनी अटक केलेला अमित जयकिशन सिंग उर्फ पपलू, याच्याबाबत पूर्णेकर यांचे चिरंजीव राम पूर्णेकर यांनी शंका उपस्थित केल्यामुळे, खळबळ उडाली आहे. हेल्मेट घातलेला आणि फरार असलेल्या या आरोपीची शरीरयष्टी आणि सीसीटीव्ही फूटेजमधील व्यक्ती, यांच्यात तफावत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. […]
अधिक वाचा...दिल्ली मेट्रोमध्ये जागेवरून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू; माजी आयएएस अधिकाऱ्यासह मुलाला अटक…
नवी दिल्ली: दिल्ली मेट्रो ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेल्या जागेवरून झालेल्या वादात एका ४८ वर्षीय व्यक्तीला थप्पड मारून जोरात ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती, पोलिसांनी येथे दिली. या प्रकरणी एक माजी आयएएस अधिकारी आणि त्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालय मेट्रो स्थानकामध्ये घडली होती. मयत पवन शर्मा […]
अधिक वाचा...बांधकामाचा राडारोडा कुठेही टाकल्यास मुंबई महापालिकेकडून २५ हजार रुपये दंड; वाहनांवर ट्रॅकिंग यंत्रणाही बंधनकारक…
मुंबई: बांधकाम आणि पाडकामाचा राडारोडा कुठेही टाकून, मुंबईतील पर्यावरणाची हानी करणाऱ्या विकसक, कंत्राटदार आणि वाहतूकदारांना यापुढे महागात पडणार आहे. राडारोड्याची अनधिकृत वाहतूक आणि विल्हेवाट रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कठोर पवित्रा घेतला आहे. आवश्यक नोंदणी न करता किंवा वाहनांवर मागोवा व देखरेख प्रणाली (व्हीटीएमएस) बसवलेली नसल्यास, राडारोड्याची वाहतूक करणाऱ्यांना प्रति वाहन २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार […]
अधिक वाचा...प्रदीप पूर्णेकर हत्याकांडप्रकरणी सुभाष शिंदेच्या कोठडीत वाढ; शस्त्रे पुरवल्याचा पोलिसांना संशय…
ठाणे: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सुभाष शिंदे उर्फ पप्या शिंदे याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आणखी तीन दिवसांची वाढ केली आहे. त्याला १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेली दोन पिस्तुले आणि तीन चॉपर कोणी उपलब्ध करून दिले, तसेच फरार आरोपी संतोष […]
अधिक वाचा...सातबारा वारस नोंदीसाठी एक लाखाची लाच; कोप्रोलीचे मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…
उरण: सातबारा पत्रकावर वारसाची नोंद करण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना, कोप्रोलीचे मंडळ अधिकारी मौजे चिरनेर येथील तलाठी आणि कार्यालयातील कोतवाल यांच्यावर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. त्यात मंडळ अधिकारी आणि कोतवाल रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मौजे चिरनेर येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीच्या सातबारा उतारावर वारस नोंद […]
अधिक वाचा...सीजेपीचे जंतर मंतरवर आंदोलन, गुरुग्राममधील घरातून युट्युबर ध्रुव राठीला घेतले ताब्यात – सीजेपीचा दावा…
नवी दिल्लीः मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी), ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’ व इतर विद्यार्थी व राजकीय संघटनांनी आज जंतरमंतर येथे आंदोलन पुकारले आहे. नियोजित केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी आज […]
अधिक वाचा...मुंबई ठाण्यासह अतितीव्र लाईट्सच्या वापरावर वेळेची मर्यादा आणा; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश…
मुंबई: सण, उत्सव, लग्न समारंभ, खेळांची मैदाने आणि सार्वजनिक ठिकाणी वापर होणाऱ्या अतितीव्र नियॉन लाईटचा मुंबई, ठाण्यासह संपूर्ण एमएमआरमधील वापर रात्री ११ नंतर पूर्णपणे बंद करा, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी राज्य शासनाला दिलेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याबाबतचे सविस्तर निर्देश १९९८ मध्ये देण्यात आले होते. मात्र, आजही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याबद्दल हायकोर्टाने […]
अधिक वाचा...
