बोरखेडी स्टेशनजवळ दुरांतो एक्सप्रेसवर दगडफेक; तीन एसी डब्यांच्या काचा फोडल्या…

नागपूरः नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावर समाजकंटकांकडून ट्रेनवर हल्ला झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री सुमारे ८:२७ वाजता, नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेन क्रमांक १२२९० दुरांतो एक्सप्रेसवर बोरखेडी स्टेशनजवळ अज्ञात समाजकंटकांनी अंदाधुंद दगडफेक केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे ट्रेनच्या तीन एसी डब्यांच्या (ए-१, बी-२ आणि बी-५) काचेच्या खिडक्या फुटल्या, ज्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. सुदैवाने […]

अधिक वाचा...

भेटलाच नाही, तर स्पष्टीकरण कशासाठी? दिशा सालियान प्रकरणी सूरज पांचोलीच्या स्पष्टीकरणावर नेटकऱ्यांची टीका…

मुंबई: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नाव समोर आल्यापासून अभिनेता सूरज पांचोलीने पहिल्यांदाच सविस्तरपणे आपले मत मांडले आहे. या प्रकरणात नाव जोडले गेल्यापासून आपल्याला सोशल मीडियावर सतत शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा दावा त्याने केला आहे. दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन आणि शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांना आपण कधीही भेटलो नव्हतो, असा दावा […]

अधिक वाचा...

दिल्लीतून माजी सहकाऱ्याला भेटण्यासाठी गुरुग्रामला गेलेल्या व्यक्तीची हत्या; मृतदेह फेकला गटारात…

नवी दिल्ली: गुरुग्राममध्ये एक तातडीची बैठक असल्याचे सांगून, दिल्लीतील एका रेस्टॉरंटमधून आपल्या निघालेल्या युवराज सिंग मनचंदा (वय ३१) या तरुणाची, त्याची माजी महिला सहकारी आणि तिच्या जोडीदाराने त्याची हत्या केली. हत्येमागे आर्थिक वाद असल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सांगितले. तरुणाचा मृतदेह एका गटारात फेकून दिलेल्या अवस्थेत आढळला आहे. ६ सप्टेंबर रोजी, तो आपल्या बहिणींसोबत दिल्लीतील लाजपत […]

अधिक वाचा...

रुग्णवाहिका आरटीओच्या रडारवर; आठ महिन्यांत ८२ रुग्णवाहिकांवर कारवाई…

मुंबईः आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो, अशा वेळी रुग्णाला रुग्णालयात पोचवणाऱ्या रुग्णवाहिकांपैकी ८२ रुग्णवाहिका नियमांचे उल्लंघन करताना आढळल्या आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जानेवारी ते ऑगस्टदरम्यान शहरातील ४२७ रुग्णवाहिकांची तपासणी केली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ७९ हजारांहून अधिक दंड आकारण्यात आला असून यामुळे मुंबईतील रुग्णवाहिकांची तंदुरुस्ती (फिटनेस), सुरक्षितता आणि आपत्कालीन तयारी पुन्हा एकदा […]

अधिक वाचा...

भिवंडीत महिलेच्या मारहाणीनंतर फळ विक्रेत्याचा पोलीस ठाण्यात नेत असताना मृत्यू…

भिवंडीः एका महिलेकडून घेतलेल्या कर्जफेडीवरून झालेल्या वादानंतर, ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये एक फळ विक्रेता मरण पावला. लक्ष्मी नाईक नावाच्या या महिलेला पोलिसांनी अटक केली असून, तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी येथे दिली. याकूब सिद्दिकी नावाच्या या फळ विक्रेत्याने सुमारे चार वर्षांपूर्वी लक्ष्मी नाईक या महिलेकडून व्यवसायासाठी काही रक्कम उधार घेतली होती. कर्जाची […]

अधिक वाचा...

महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेसह इतरांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल…

ठाणे: कल्याण-डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर चार आरोपींविरुद्ध कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह रमेश पवार, प्रमोद निकम, अक्षय करंडे आणि साधना करंडे यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ६ जुलै रोजी […]

अधिक वाचा...

दिल्लीत एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या; त्यापैकी सहा मजली इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक विद्यार्थी अडकल्याची भीती…

नवी दिल्लीः राजधानी दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या. त्यापैकी एका सहा मजली इमारतीमध्ये दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी पेईंग गेस्ट म्हणून राहात होते. अपघात झाला, तेव्हा विद्यार्थी त्यांच्या खोल्यांमध्येच होते. त्यापैकी तिघांना वाचवण्यात आले आहे. मात्र, ढिगाऱ्याखाली किती विद्यार्थी अडकले आहेत, हे अद्याप समजू शकले नाही. सुरक्षेसाठी जवळच्या इमारतीही रिकाम्या करण्यात आल्या आहेत. ही […]

अधिक वाचा...

नृत्याच्या वर्गासाठी जाणाऱ्या महिलेने स्वयंपाकास नकार दिल्याने मद्यधुंद पतीने केली निर्घृण हत्या…

नागपूर: गृहनिर्माण संस्थेतील नृत्य वर्गात जाण्यासाठी तयार झालेल्या महिलेला, तिच्या मद्यधुंद पतीने स्वयंपाक करण्यास सांगितले. तथापि, तिने नकार दिल्याने मतभेदाचे पर्यवसान हिंसेत झाले आणि संतापलेल्या पतीने तिला ठार मारले. घरात स्वयंपाक करण्याऐवजी नृत्याच्या वर्गात जाण्याच्या महिलेच्या निर्णयावरून सुरू झालेल्या वादानंतर, पतीने तिला मारहाण केली. मारहाण करताना एक घाव वर्मी बसल्याने ही महिला मृत्यूमुखी पडली. पोलिसांनी […]

अधिक वाचा...

नेरुळ रेल्वे स्थानकात मद्यपी, गर्दुल्ले, बेघरांविरोधात कारवाई; कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी…

नवी मुंबई: नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात मद्यपींकडून होणारी हुल्लडबाजी, अंमली पदार्थांचे सेवन व विक्री, गुटख्याची विक्री तसेच बेघर आणि गर्दुल्ल्यांमुळे प्रवाशांना होणारा त्रास रोखण्यासाठी, नवी मुंबई पोलिसांनी महापालिका आणि ‘सिडको’च्या सहकार्याने मध्यरात्री धडक कारवाई केली. या पार्श्वभूमीवर, नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा व देखरेख व्यवस्था उभारण्याची गरज असल्याचे, महापौर सुजाता पाटील यांनी येथे […]

अधिक वाचा...

संतापजनक! पुणे जिल्ह्यात मार्कशीटवर खाडाखोड केल्याने मुलीला क्रूरपणे संपवलं…

पुणे : पुणे जिल्ह्यात जन्मदात्या बापाने आपली पोटच्या मुलीला अमानुषपणे संपवल्याची संतापजनक घटना समोर आली आहे, भावाच्या मार्कलिस्टवरती खाडाखोड केल्याच्या रागातून बापाने लाकूड कापण्याच्या यंत्राने केलेल्या अमानुष मारहाणीत नऊ वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. दौंड तालुक्यातील देऊळगावराजे हद्दीत हनुमानवस्ती येथे रविवारी (ता ३ मे) दुपारी घडली आहे. चिमुकलीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!