
पुणे! पायल झांबरे मृत्यू प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे…
पुणे: पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात तिचा नवरा अक्षय झांबरे, सासू आणि सासऱ्याला सात नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अरविंद झांबरे (सासरा) आणि मंगल झांबरे (सासू) असं त्यांचं नाव असून त्यांच्या वकिलांनी शिवाजीनगर न्यायालयात धक्कादायक युक्तीवाद केला आहे.
पायल झांबरेच्या सासू-सासऱ्याला न्यायालयात हजर केल्यावर दोन्ही पक्षाकडून युक्तीवाद करण्यात आला. सासू – सासऱ्याला दुपारी दीड वाजता अटक झाली. त्यानंतर त्यांना कोर्टात पाच वाजता हजर करण्यात आले. त्यामुळे पोलिसांना चौकशी करायला पूरेसा वेळ मिळाला नाही. त्यासोबत त्यांचे मोबाईल जप्त झालेले नाही. त्या ठिकाणाचे सीसीटीव्ही जप्त करण्यात आलेले नाही. मुळात पाहता चार भिंतीमध्ये नेमकं त्या दिवशी काय झालं याचा तपास करण्यासाठी जास्त जास्त पोलीस कोठडीची त्यांना गरज आहे. दरम्यान नणंद अजून अटक झाली नाही आहे. आम्हाला पोलिसांवर आणि न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे.
View this post on Instagram
त्यासोबत महत्त्वाचे म्हणजे पायलने तिचा भाऊ ऋषिकेशला मेसेज केला होता की, सासू जबाबदार आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने कोर्टाने पायलचा नवरा अक्षयसह सासू सासऱ्याला 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पायलचे वकील पुष्कर पाटील यांनी सांगितलं की, आरोपीच्या वकिलांकडून असं म्हणणं होतं जे त्यांनी न्यायालयासमोर मांडलं भाकरी नीट केली नाही यावरून सासू – सुनेचा वाद झाला म्हणून या कारणाने त्यांनी आत्महत्या केली.’
पुणे! पायलच्या लग्नासाठी लाखो रुपयांचा खर्च; मुलगी झाल्यानंतर वाद अन् भावाला शेवटचा मेसेज…
पुण्यातील नामांकित कुटुंबातील IT इंजिनिअर सूनेची आत्महत्या; परिसरात खळबळ…
सांगली! प्रेमविवाह केलेल्या युवतीची आत्महत्या; मानपान अन् माहेरहून पैसे आण…
पुणे! IT इंजिनिअर महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून घेतला गळफास…
पुणे! सारसबागेसमोर बंद कारमध्ये आढळला युवकाचा मृतदेह…
पुणे! सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ; विवाहितेची आत्महत्या…
पुणे! भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी भावाची आत्महत्या; ताई त्यांना सोडू नको…
पुणे! IT इंजिनिअरची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या; प्रेमप्रकरण की तणाव…

