‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल; विषारी सापांचं विष…
मुंबईः ‘बिग बॉस ओटीटी’चा विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचे विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एल्विशसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडामध्ये एल्विश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिग बॉस विजेता बनल्यानंतर चर्चेत आलेला युट्यूबर एल्विश यादव अडचणीत सापडला आहे. नोएडा पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला असून एल्विश यादव याच्यावर तस्करी तसेच रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे. नोएडा पोलिसांना सेक्टर ४९ मध्ये छापा टाकून पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी पाच कोब्रा साप देखील जप्त केले असून यासोबतच सापांचे विष देखील सापडले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान बिग बॉस विजेता एल्विश यादव याचे नाव समोर आले आहे.
दरम्यान, प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव नोएडा-एनसीआरच्या फार्महाऊसवर काही लोकांना भेटून सापाचे विष आणि जिवंत सापांसोबत व्हिडीओ शूट करत असल्याबद्दल माहिती मिळाली. तसेच रेव्ह पार्टीदेखील आयोजित केल्याची माहिती समोर आली होती.
पोलिसांनी केलेल्या छापेमारीत सापाचे विष, पाच कोब्रा, एक अजगर आणि दोन तोंड असलेला एक साप, एक घोडा पछाड साप आढळला आहे. पोलिसांनी सांगितले की, या छापेमारीत पाच आरोपींना अटक केली आहे. एल्विश यादवसह सहा जण आणि काही अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, एल्विश यादव याच्या सहभागाचा तपास केला जाणार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे खंडणीची मागणी…
हृदयद्रावक! गरोदर अभिनेत्रीने बाळाला न पाहताच घेतला जगाचा निरोप…
प्रसिद्ध अभिनेत्रीची घरात गळफास घेऊन आत्महत्या…
ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा…
अभिनेता शाहरुख खानला सरकारने पुरवली Y+ स्कॉट सुरक्षा; कारण…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!