
सीन रिक्रिएशन! लोहगडावर दाट धुकं अन् पाऊस, पोलिस भल्या पहाटे चेतनला घेऊन गेले…
पुणे: केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी संगनमत करूनच केतनला लोहगडावर संपवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून ते सध्या पोलिस कोठडीत आहे. दोघांची कसून चौकशी केली जात आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिस आरोपी चेतन चौधरी याला आज पहाटे लोहगडावर घेऊन दाखल झाले होते.. क्राइम सीन रिक्रिएशनसाठी त्याला लोहगडावर आणण्यात आले आहे. यापूर्वी सिया गोयलला देखील गडावर आणण्यात आले होतं. तिने लोहगडाच्या नेमक्या कोणत्या पाँईंटवरून केतनला धक्का दिला, याची माहिती पोलिसांनी मिळवली होती. तसेच यावेळी पोलिसांनी केतन अग्रवाल याच्या वजन आणि उंचीएवढा डमी पुतळा देखील आणला होता. या पुतळ्याला सियाला धक्का मारायला सांगितले होते.
View this post on Instagram
चेतनला घेऊन पोलिस लोहगडावर गेले होते. ज्या पॉइंटवरून केतनला ढकलण्यात आलं, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात दाट धुकं होतं, असं असूनही पोलिसांनी चेतनला गडावर आणले. केतन आणि सिया कोणत्या मार्गाने वर आले? तो स्वत: कोणत्या मार्गाने वर गेला? जेव्हा केतन दरीत कोसळला, तेव्हा त्याला धक्का कुणी दिला? सिया कुठे होती? घटनास्थळी नेमकं काय घडलं? अशा सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.
दरम्यान, केतन अग्रवाल याची १८ जून रोजी लोहगडावरून ढकलून देत हत्या करण्यात आली होती. त्याला लोहगडावरून ढकलून देण्यात आलं होते. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनीच संगनमत करून चेतनची हत्या केल्यानंतर हा सगळा अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चेतन कैद झाला होता. यावरून या हत्याकांडाचं बिंग फुटलं आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
सियाचा चक्रावून टाकणारा खुलासा! केतनसोबत महाबळेश्वरला रुममध्ये राहायचं नव्हतं…
सिया हिचा धक्कादायक खुलासा; केतनला दरीत ढकलल्यानंतर चेतन पळून गेला अन्…
केतनच्या वडिलांनी सियाबद्दल केला मोठा खुलासा; तिला अनेक वाईट व्यसनं…
केतनचे टक्कल अन् एक गोष्ट खटकायची, पोलिस तपासात सिया लागली घडाघडा बोलू…
खळबळजनक खुलासा! सिया बारावी नापास, दारूचं व्यसन, अनेक बॉयफ्रेंड अन्…
पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल रात्रीच्या अंधारात पोहचले लोहगडावर अन्…
सियाची आई म्हणाली; केतनने मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलं; दोघांनाही ढकलून द्या…
सिया गोयल हिच्या वडिलांचा मोठा खुलासा; सगळं खोटं…
केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट; सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले…
केतन जिवंत असल्याचे पोलिसांनी सांगताच सियाला फुटला घाम…
केतनला संपवण्यासाठी सिया-चेतन महाभयंकर प्लॅन बी होता तयार; पोलिसही चक्रावले…
केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…
पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…
केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…
पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…
पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…

