
कुटुंबात लग्नाची लगबग अन् नगरसेविकेच्या मुलाने घेतला गळफास…
अकोला : मूर्तिजापूर शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविकेच्या मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रशांत सोळंके (वय ३२) असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच प्रशांतचा साखरपुडा झाला होता आणि लवकरच त्याच्या विवाहाची तयारी सुरू होणार होती. मात्र, त्यापूर्वीच त्याने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे सोळंके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मूर्तिजापूर शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग क्रमांक 2 च्या नगरसेविका सुनंदा सोळंके यांचे पुत्र प्रशांत सोळंके यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
View this post on Instagram
काही महिन्यांपूर्वीच प्रशांत यांचा साखरपुडा पार पडला होता. कुटुंबात लग्नाची लगबग सुरू होती. मात्र, विवाहाच्या काही महिने आधीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने कुटुंबीयांसह नातेवाईक मोठा धक्का बसला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक! करंडे कुटुंबातील ६ जणांचा होरपळून मृत्यू; पाहा नावे…
पायल झांबरे मृत्यू प्रकरण! घरातून सोने, चांदीचे दागिने, मोबाईलसह सीसीटीव्ही फुटेज जप्त अन्…
नाशिक! बहिणीसोबत प्रेमसंबंध असलेल्या युवकाला स्मशानभूमीजवळ बोलावले अन्…
‘पोलीस भरती घोटाळा’ रॅकेट उघडकीस आणणार्या वैभव चव्हाण याचा संशयास्पद मृत्यू…
आदिवासी मुलींच्या वस्तीगृहात आढळला संशयास्पद अवस्थेत मृतदेह…

