
सांगली! पुण्यातून दिवाळीनिमित्त गावी गेलेल्या विवाहित प्रेयसीची हत्या…
सांगली: प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून एकाने विवाहित प्रेयसीचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना जत तालुक्यातल्या कंठी गावात घडली आहे. राजाक्का काशीराम खरात (वय ३०) असे मृत विवाहित महिलेचे नाव असून, या प्रकरणी जत पोलिसांनी अवघ्या काही तासांतच मुख्य संशयित प्रियकर मनोज कोळेकर याच्यासह त्याच्या एका साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मृत राजाक्का खरात या कामानिमित्त पुणे येथे राहत होत्या. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त त्या आपल्या मूळगावी, कंठी गावात आल्या होत्या. यादरम्यान, राजाक्का यांचे कंठी गावातीलच मनोज कोळेकर याच्यासोबत मागील काही काळापासून प्रेमसंबंध झाले होते. रविवारी सायंकाळी संशयित मनोज कोळेकर याने राजाक्का यांना भेटण्यासाठी आणि पुन्हा प्रेमसंबंध सुरू ठेवण्यासाठी सतत तगादा लावला. मात्र, राजाक्का यांनी त्याच्या या मागणीला स्पष्ट शब्दांत नकार दिला. यामधून मनोजने टोकाचे पाऊल उचलले. मनोज कोळेकर याने थेट राजाक्का यांच्या घर गाठले आणि जवळील धारदार शस्त्राने राजाक्का यांच्यावर वार केले. या हल्ल्यात राजाक्का या रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्या आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
View this post on Instagram
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जत पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी मुख्य आरोपी मनोज कोळेकर याला आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. जत पोलीस याप्रकरणी अधिक कसून चौकशी करत असून, यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
सांगली! प्रेमविवाह केलेल्या युवतीची आत्महत्या; मानपान अन् माहेरहून पैसे आण…
सांगलीमध्ये लग्न मोडल्याचा राग अन् सपासप वार करत केली हत्या…
सांगली! प्रेमविवाहानंतर रात्रीच्या सुमारास दुसऱ्या प्रियकराला घरी बोलवलं अन्…
सांगलीत किरकोळ वादातून शेजाऱ्याने नवरा-बायकोला संपवलं…
सांगली! सामूहिक बलात्कार करत मुलीचे कपडेही पळवले; विवस्त्र अवस्थेत चालत राहिली…

