
केतन जिवंत असल्याचे पोलिसांनी सांगताच सियाला फुटला घाम…
पुणे: केतन अग्रवाल याची लोहगडावरून ढकलून १८ जून रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली आहे. दोघांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, सगळ्यात आधी घटनास्थळावर गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे.
सियाने ज्यावेळी केतनला गडावरून ढकलून दिलं. तेव्हा तिने आरडाओरडा केला. केतन खाली पडल्याची माहिती तिने इतर पर्यटकांना दिली. याची माहिती जेव्हा गडावरील पोलिस कर्मचाऱ्याला मिळाली. तेव्हा कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी सिया तिथे उभी होती, मात्र तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते. पोलिस घटनास्थळी येताच तिने केतन फोटो काढताना गडावरून खाली पडल्याचे सांगितले.
View this post on Instagram
पोलिसांनी सियाला वरच थांबवलं आणि स्वत: केतनचा शोध घेण्यासाठी खाली उतरले. जेव्हा ते खाली पोहोचले तेव्हा केतन रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडला होता. त्याची काहीच हालचाल होत नव्हती. पोलिस कर्मचारी राहुल वर आले, तेव्हा त्यांनी सियाला धीर देण्यासाठी आणि तिला धक्का बसू नये यासाठी ‘केतन जिवंत आहे’ असे सांगितले. परंतु, पोलिसांनी दिलेली ही माहिती ऐकून खूश होण्याऐवजी सिया प्रचंड घाबरली, असा गौप्यस्फोट घटनास्थळावर सगळ्यात आधी पोहोचलेले पोलिस कर्मचारी राहुल यांनी केला आहे. या प्रकरणी सध्या पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला अटक केली आहे. त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असून पोलिस त्यांची कसून चौकशी करत आहेत.
प्राथमिक तपासानुसार, सिया आणि चेतन हे दोघं मागील चार वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. मागील वर्षभरापासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. चेतन चौधरी यांच्या वडिलांचा व्यवसाय हा सियाच्या वडिलांच्या व्यावसायाच्या शेजारीच आहे. दोघंही पहिल्यांदा एका पार्टीत भेटले होते. तिथून त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. यानंतर सियाने पुण्यात बेकरीचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यावसायाच्या निमित्ताने चेतन आणि सियाची जवळीक वाढली होती.
केतनला संपवण्यासाठी सिया-चेतन महाभयंकर प्लॅन बी होता तयार; पोलिसही चक्रावले…
केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…
पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…
केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…
पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…
पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…

