पंढरपूरच्या सत्तरीमधील प्रेमप्रकरणाचा भयानक शेवट; हत्येचे कारण समोर…

सोलापूर: पंढरपूर तालुक्यामध्ये वयाच्या सत्तरीमधील दोन वृद्धांच्या प्रेमप्रकरणातून एका ७० वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत सूत्रे फिरवून आरोपी वृद्ध महिलेला गजाआड केले असून, वृद्धाचे हत्या करण्याचे धक्कादायक कारण पुढे आले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते.

प्रियकर आपल्या सुनेबाबत वाईट बोलत असल्याचे दिसताच संताप अनावर झाला आणि यातूनच प्रेयसीने प्रियकराची हत्या केली. पंढरपूर तालुक्यातील या दोन वृद्धांच्या प्रेम प्रकरणाचा रक्तरंजित शेवट झाला. पंढरपूरच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हे गुंतागुंतीचे कोडे सोडविले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)


पंढरपूर तालुक्यातील शंकर गाव येथील अंबादास खांडेकर (वय ७०) आणि मंगल होनमाने (वय ६५) यांचे प्रेमसंबंध होते. अंबादास आणि मंगल या वृद्ध जोडप्याच्या प्रेमप्रकराबद्दल अनेकांना माहित होते. मात्र, उघडपणे कोणीही बोलून नव्हते. अंबादास नियमितपणे मंगल यांच्या घरी येत जात असे. गेली पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ प्रेमसंबंधात अडकलेल्या दोन प्रेमींमध्ये वाद झाला आणि याचा शेवट रक्तरंजित झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबादास हा 27 जुलै रोजी मंगल हिच्या घरी गेला असता त्याने मंगलच्या सुनेबद्दल वाईट शब्द काढले. यातूनच संतापलेल्या मंगलने कोयत्याने प्रेमी अंबादास याच्यावर वार केले. यातच अंबादास यांचा मृत्यू झाला. आपल्यावर कोणाला संशय येऊ नये म्हणून एका शेतामध्ये अंबादास यांचा मृतदेह अर्धवट जाळून टाकला होता. हा अर्धवट जळलेला मृतदेह नंतर एका विहिरीमध्ये टाकून देण्यात आला होता.

दरम्यान, आपल्या मुलीकडे गेलेले अंबादास पुन्हा परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पंढरपूर तालुका पोलिसात 30 जुलै रोजी मिसिंगची तक्रार दाखल केली. दोन ऑगस्ट रोजी संपूर्ण कुजलेला आणि हाडाचा सांगाडा उरलेला मृतदेह पोलिसांना मिळाला. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असता हा मृतदेह अंबादास खांडेकर यांचा असल्याचा संशय पोलिसांना आला. नंतर पोलिसांनी अंबादास यांच्या दोन्ही मुलींच्या डीएनए सोबत तपासणी केल्यावर हा मृतदेह अंबादास याचाच असल्याचे समोर आले. यानंतर अवघ्या 12 तासात पोलिसांनी तपास करीत मंगल होनमाने हिला अटक केली आहे. न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने मंगल होनमाने दिला पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पंढरपूर! वयाच्या सत्तरीमधील प्रेम अन् वृद्ध प्रेयसीने केले नको ते कांड…

सोलापूर हादरलं! प्रेमप्रकरणातून युवकाला झाडाला बांधून बेदम मारहाण, अखेर मृत्यू…

सोलापूर! लग्नानंतर दोनच महिन्यात समजलं पत्नीचं प्रेम प्रकरण अन्…

सोलापूर! एकतर्फी प्रेमातून पत्नीचा छळ, दामपत्याने संपवलं जीवन…

सोलापूरमधील दीर-वहिणी प्रेमसंबंध! जळलेल्या महिलेलं गुढ उलगडलं…

सोलापूर! मुलाचे गावातील महिलेसोबत प्रेमसंबंध; आईने केला विरोध अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!