
केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…
पुणे : लोणावळ्याजवळील लोहगडावरील दरीत कोसळून केतन अग्रवाल (वय २४) याचा मृत्यू झाला आहे. केतन अग्रवाल याच्या होणाऱ्या पत्नीनेच दरीत ढकलल्याचे तपासादरम्यान समोर आले. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने तिच्या प्रियकराच्या मदतीने हे कृत्य केल्याचं उघड झाले आहे. केतनच्या मृत्यूनंतर सियाने कोणाला तिच्यावर शंका येऊ नये म्हणून रडण्याचे नाटक करत राहिली. तिने केतनच्या मृत्यूनंतर भलीमोठी पोस्ट लिहिली होती.
केतन अग्रवाल आणि सिया गोयल हे दोघेही व्यावसायिकांची मुलं. दोघांचे लग्न हे घरच्यांनी ठरवले होते. नोव्हेंबरमध्ये जयपूरमध्ये हा शाही विवाहसोहळा होणार होता. मात्र, सिया गोयल हिला केतन पसंत नसल्यानं तिने हत्येचा कट रचल्याचे उघड झाले. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सियाच्या वाढदिवसानिमित्त ती केतन, कुटुंबीय आणि मित्रांसोबत फिरायला गेली होती. तिच्या वाढदिवसाचं महाबळेश्वरमध्ये जंगी सेलिब्रेशन होणार होतं, केतननने त्यासाठी खूप तयारीही केली होती. मात्र, सियाच्या डोक्यात दुसराच प्लान घोळत होता. कुटुंबियांनी केतनशी ठरवलेले लग्न तिला मंजूर नव्हतं, म्हणूनच तिने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
पोलिसांनी सियाला केतनच्या हत्येच्या आरोपखाली अटक केली आहे. सियाची सोशल मीडियावरील एक पोस्ट व्हायरल झाली आहे. 19 जूनला सियाचा वाढदिवस असतो, त्याच्या आदल्या दिवसीच केतनचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वाढदिवसाच्या दिवशी सियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून केतनसोबतचे काही फोटो, व्हिडीओ पोस्ट केले होते आणि एक लांबलचक पोस्टही लिहीत त्याच्या जाण्याबद्दल दु:ख व्यक्त केले होते.
पोस्टमध्ये म्हणाली, केतन तू मला माझ्या वाढदिवशी मला सोडून गेला. आपलं लग्न इतक्या जवळ असताना तू मला का सोडून गेलास हे अजूनही मला समजत नाही. माझी अनेक स्वप्नं होती, अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मला कधीच मिळणार नाहीत. मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं, असं असतानाही तू मला का सोडून गेलास? Rest in Peace,” अशी पोस्ट सियाने केली होती.
आपल्या वाढदिवशी सियाने केतनसाठी लिहिलेली पोस्ट अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. मात्र, सियाच खूनी असेल याची कोणी कल्पना देखील केली नव्हती. सियाच्या या पोसटवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवताना सहानुभूती व्यक्त केली होती. पण, पोलिसांनी तपास केला आणि अडकली.
दरम्यान, परदेशातून उच्च शिक्षण पूर्ण करून नुकताच वडिलांच्या कन्स्ट्रक्शन व्यवसायात केतन अग्रवाल स्थिरावला होता. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या त्याच्या शाही विवाहाची जय्यत तयारी सुरू होती. राजस्थानमधील जयपूर येथे एका भव्य पॅलेसमध्ये तब्बल 17 कोटी रुपये खर्चून विवाहसोहळ्यासाठी एक पॅलेस देखील बुक केला होता. व्हीआयपी पाहुण्यांच्या प्रवासासाठी दोन खासगी विमानेही बुक झाली होती. संपूर्ण अग्रवाल कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, या हत्येच्या घटनेमागील एक एक प्रकरणं बाहेर येत आहेत.
सियाच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे याप्रकरणाला आणखी धक्कादायक वळण मिळाले आहे. केतनच्या मृत्यूच्या बरोबर एक महिना आधी, म्हणजेच 18 मे रोजी सियाने इन्स्टाग्रामवर एक बर्थडे काउंटडाउन स्टोरी शेअर केली होती, ज्यामध्ये केतनने तिला खुश करण्यासाठी केलेले खास प्रयत्न आणि दोघांमधील अथांग प्रेम दिसत होते. बाहेरील जगाला त्यांचे नाते आदर्श वाटत असतानाच पडद्यामागे मात्र एका निष्पाप जिवाचा बळी घेण्याचा भयानक कट शिजत होता, ज्यामुळे सध्या परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…
पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…
प्रसिद्ध डॉक्टरने स्वतःला इंजेक्शन टोचून केली आत्महत्या; धक्कादायक माहिती समोर…
पुणे शहरात स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; गॅलरीतून उडी मारताना महिलेचा मृत्यू…
पुणे! संक्रांतीच्या दिवशीच ट्रकच्या धडकेत सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू…
पुणे! नवीन थारने कोकणात जाताना अपघातात सहा मित्रांचा मृत्यू; पाहा नावे…
पुणे! नवले पूल अपघतात अभिनेत्याचा मृत्यू! चिमुकला झाला पोरका…

