सियाची आई म्हणाली; केतनने मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलं; दोघांनाही ढकलून द्या…

पुणे : केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी कट रचून केतनचा जीव घेतला. या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली असून 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींकडून दररोज स्वतःच्या बचावासाठी नवनवे दावे केले जात आहे. पोलीस चौकशीत या प्रकरणाचे नवे हादरवणारे खुलासेही समोर येत आहेत. या सगळ्या प्रकरणावर सिया गोयल हिच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.

सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी या संपूर्ण प्रकरणानंतर मोठा धक्का बसला आहे. यात त्यांना अचानक उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सियाच्या आईनं म्हटले की, ‘केततने आम्हाला मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलं. त्याच्या मृत्यूला आमची मुलगी जबाबदार असेल, तर दोघांनाही कड्यावरून ढकलून द्या.’

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

सियाच्या वडिलांनी भलताच दावा केला आहे. सियावरील सर्व आरोप फेटाळत ते म्हणाले, सिया केतनला लोहगडावरून घेऊन गेलीच नाही. उद्या आपल्याला महाबळेश्वरला जायचे आहे आपण थकून जाऊ… सियाने लोहगडावर जाण्यास नकार दिला होता. सियाने चॅट देखील दाखवले होते. केतनने अनेक फोन केल्यानंतर सिया तयार झाली होती. जे कोणी आरोपी आहेत, त्यांना कठोरातील कठोर म्हणजे फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. न्यायालयात जर हत्या केल्याचे सिद्ध झाले, तर तिलाही शिक्षा द्या, हे मी पूर्ण जबाबदारीने सांगत आहे. पण आमच्या मुलीचे केतनवर प्रेम होते त्यामुळे ती असं करू शकत नाही’.

सियाची आई म्हणाली, ‘केतन हा माझा जावई नव्हता तर तो माझा मुलगा होता. माझ्या स्वतःचा मुलानेही माझ्यावर कधी इतके प्रेम केले नसेल, जितके केतनने केले. केतनची हत्या ज्याने कोणी केली आहे, त्याला कडक शिक्षा मिळालीच पाहिजे. हे कृत्य नेमके कोणी केले, हे त्या देवालाच ठाऊक आहे.’

सिया गोयल हिच्या वडिलांचा मोठा खुलासा; सगळं खोटं…

केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट; सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले…

केतन जिवंत असल्याचे पोलिसांनी सांगताच सियाला फुटला घाम…

केतनला संपवण्यासाठी सिया-चेतन महाभयंकर प्लॅन बी होता तयार; पोलिसही चक्रावले…

केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…

पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…

केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…

पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…

पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!