
सैराट! वडिलांच्या दाव्यामुळे आता या प्रकरणात आला नवा ट्विस्ट…
पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याला मारहाण झाल्याची घटना घडली होती. शिवाय, विवाहित मुलीचं अपहरण करण्यात आले होते. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी १५ जणांवर गुन्हे दाखल करत मुलीच्या आईसह दोन भावांना अटक केली. पोलिसांनी विवाहितेची सुटका करत तिला नवऱ्याच्या ताब्यात दिले आहे. पण आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!
मुलगी प्राजक्ताचे वडील राजाराम काशीद यांनी वेगळाच दावा करताना म्हटले आहे की, तांत्रिक विद्येचा वापर करून आपल्या मुलीला जाळ्यात अडकवले आणि आपल्याला कोणतीही कल्पना न देता, हा विवाह केला आहे. शिवाय, प्राजक्ताने ज्याच्यासोबत लग्न केलं, तो विश्वनाथ गोसावी हा आधीच विवाहित आहे. त्याला दोन मुलं आणि पत्नी आहे. पहिलं लग्न झालेलं असताना देखील गोसावीने आपल्या मुलीला अंधारात ठेवून आळंदीत तिला फसवून लग्न केले आहे. कोणताही भाऊ किंवा आई आपल्या मुलीचे अपहरण करू शकेल का? असा सवालही त्यांनी विचारला आहे. या बाबाने (विश्वनाथ गोसावी) पहिली बायको असताना तिच्यासोबत घटस्फोट झाला नसताना त्याने माझ्या मुलीला खोट सांगून विवाह केला आहे. या व्यतिरिक्त त्याचे विवाह झाले आहेत. मात्र, लोक पुढे येत नसल्याचा खुलासा केला आहे.’
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
आपली मुलगी नोकरी निमित्त बँगलोरला होती. त्यामुळे त्याने मुलीला कधी महाराष्ट्रात बोलवून घेतले आणि लग्न केले, हे आम्हाला कळू दिले नाही, असेही राजाराम काशीद यांनी म्हटले आहे. वडिलांच्या दाव्यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट बघायला मिळत आहे.
सैराट! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून बेदम मारहाण अन् अपहरण…
सैराटची पुरावृत्ती! वडील आणि मलगी समोरासमोर आली अन् नको ते घडलं…
सैराट! प्रेमविवाह करताच २४ तासातच नवरीची केली हत्या…
सैराटची पुनरावृत्ती! प्रेम विवाह केल्याचा रागातून जावयाला क्रूरपणे संपवलं…
‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…
प्रेमाची सैराट कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह अन् पुढे…

