
पुणे! पायलच्या लग्नासाठी लाखो रुपयांचा खर्च; मुलगी झाल्यानंतर वाद अन् भावाला शेवटचा मेसेज…
पुणे: पुणे शहरातील मुकुंदनगर परिसरातील विवाहित युवती आणि IT अभियंता पायल झांबरे हिच्या मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. दिवाळी सणाला घरून १० तोळे सोनं घेऊन यावं, यासाठी तिचा सासरच्यांकडून छळ सुरू होता. याच छळाला कंटाळून तिने आपल्या सासरच्या कुटुंबाच्या जुन्या फ्लॅटमध्ये गळफास लावून जीवन संपवले आहे. मृत्यूच्या आदल्या रात्री तिने आपल्या भावाला टेक्स्ट मेसेज केला होता. यानंतर तिचा फोन बंद झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
घटनेच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं? याचा सविस्तर घटनाक्रम भाऊ ऋषीकेश पवार याने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत सांगितला आहे. प्रकरणी पोलिसांनी पायलचा पती अक्षय अरविंद झांबरे याच्यासह सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, पायल हिचा विवाह १३ मार्च २०१९ रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार अक्षय झांबरे याच्यासोबत झाला होता. या लग्नात माहेरच्या लोकांनी ५० तोळे सोने, २५ लाख रुपये रोख रक्कम असा एकूण ७० ते ८० लाख रुपयांचा खर्च केला होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच सासरच्या मंडळींकडून पायलचा छळ सुरू झाला. सासू मंगल झांबरे आणि पती अक्षय हे प्रत्येक सणाला माहेरहून पैसे आणि सोनं आणण्यासाठी पायलला सतत मानसिक त्रास देत होते.
View this post on Instagram
पायल हिला ३० मार्च २०२३ रोजी मुलगी झाली. मुलगी झाल्यावर सासरच्या मंडळींनी रुग्णालयात जाऊन वाद घातला आणि “आम्हाला मुलगा हवा होता, तुला मुलगी कशी झाली, आम्ही ही मुलगी सांभाळणार नाही,” असं म्हणून ते तिथून निघून गेले. त्यानंतरही वारंवार शिवीगाळ करणे आणि शारीरिक-मानसिक त्रास देणं सुरूच ठेवले होते.
घटनेच्या दिवशी १ नोव्हेंबर २०२६ ला पायल माहेरहून सासरी परतली होती. रात्री ९:१८ मिनिटांनी तिने फिर्यादी भाऊ ऋषीकेशला मोबाईलवरून एक टेक्स्ट मेसेज पाठवला, ज्यामध्ये तिने “माझी सासू जबाबदार आहे” असे लिहिले होते. भावाने ताबडतोब तिच्या फोनवर संपर्क साधला असता तिने फोन उचलला नाही. जेव्हा तिच्या पतीला फोन केला, तेव्हा त्याने उद्धटपणे उडवाउडवीची उत्तरे दिली आणि घरच्या भांडणात पडू नका, असे सांगून फोन कट केला.
कुटुंबीयांनी रात्री उशिरापर्यंत सासरच्या मंडळींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वांचे फोन बंद लागत होते. पहाटे सासरच्या मंडळींनी फोन करून पायल घरी न आल्याची माहिती दिली. त्यामुळे संशय आल्याने माहेरचे लोक मुकुंदनगरमधील झांबरे पॅलेस येथील सासरच्या घरी पोहोचले. पायलबाबत विचारपूस केली. मात्र तिच्याबद्दल कुणीच काही सांगितलं नाही. शेवटी पती अक्षय याने पायल समोरील फ्लॅटमध्ये असेल असं म्हटलं. यानंतर पतीसह माहेरची सर्व मंडळी संबंधित फ्लॅटवर पोहोचले. पण दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे फिर्यादी भावाने मागील गॅलरीतील दरवाजाची काच फोडून आत प्रवेश केला आणि मुख्य दरवाजा उघडला. यानंतर सर्वांनी किचनमध्ये पाहणी केली असता, पायल हिने सिलिंगच्या कडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचं निदर्शनास आले. यानंतर पोलिसांच्या मदतीने तिला तत्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, याप्रकरणी मृत विवाहितेच्या भावाच्या जबाबावरून स्वारगेट पोलिसांनी पती, सासू, सासरा व नणंद यांच्याविरुद्ध हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पुण्यातील नामांकित कुटुंबातील IT इंजिनिअर सूनेची आत्महत्या; परिसरात खळबळ…
पुणे! IT इंजिनिअर महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून घेतला गळफास…
पुणे! सारसबागेसमोर बंद कारमध्ये आढळला युवकाचा मृतदेह…
पुणे! सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ; विवाहितेची आत्महत्या…
पुणे! भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी भावाची आत्महत्या; ताई त्यांना सोडू नको…
पुणे! IT इंजिनिअरची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या; प्रेमप्रकरण की तणाव…

