केतनच्या वडिलांनी सियाबद्दल केला मोठा खुलासा; तिला अनेक वाईट व्यसनं…

पुणे : लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्याकांडातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी बचावासाठी एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. यासोबतच खोटे दावेही करत आहेत. दरम्यान, हे लग्न ठरण्याआधीही सियाने काही गोष्टी खोट्या सांगितल्या असल्याचे आता समोर आले आहे. सियाच्या संपूर्ण खोटेपणाचा पर्दाफाश करणारा मोठा खुलासा केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी केला आहे.

प्रसार माध्यमांनी जेव्हा विशाल अग्रवाल यांना विचारले की, “आरोपी सिया गोयलच्या पार्श्वभूमीमधून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे का?” यावर उत्तर देताना केतनचे वडील म्हणाले, “जेव्हा केतन आणि सियाचे लग्न ठरत होते, तेव्हा आम्हाला सांगण्यात आले होते की सिया ही उच्चशिक्षित असून तिने कॉमर्सचे शिक्षण घेतले आहे. इतकेच नव्हे, तर ती स्वतःचा स्वतंत्र बेकरी व्यवसाय सुरू करणार असल्याचेही भासवण्यात आले होते. मात्र, आता पोलिस तपासात जी माहिती समोर आली आहे, ती ऐकून आम्ही थक्क आहोत. सिया ही केवळ १० वी पास असून चक्क १२ वी नापास आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

विशाल अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, सिया केवळ शिक्षणाच्या बाबतीतच खोटी नव्हती, तर तिला दारू पिण्याची आणि इतर अनेक वाईट व्यसने जडली होती. तिच्या या उद्ध्वस्त करणाऱ्या वागण्यामुळे आणि छुप्या करतुतींमुळे तिचे स्वतःचे कुटुंब देखील प्रचंड त्रस्त झाले होते. त्यामुळेच एका चांगल्या आणि सुप्रतिष्ठित घरात तिचे लग्न लावून दिले, तर तिचे आयुष्य सुधारेल आणि ती स्थिर होईल, असा विचार तिच्या पालकांनी केला होता. याच कारणासाठी तिच्या पालकांनी केतनशी लग्न करण्यासाठी सियावर प्रचंड दबाव आणला होता.

सियाला जर केतनच्या विगमुळे किंवा बोलण्यामुळे लग्न करायचे नव्हते, तर तिने लग्नाला नकार का दिला नाही? ते म्हणाले, “तुम्ही संपूर्ण तपास प्रक्रियेत कुठेही पाहिलं, तरी सियाने या कारणावरून कधी लग्नाला नकार दिला होता, असं कुठेही समोर आलेलं नाही. जर तिला केतन आवडत नव्हता, तर लग्नाला नकार देणं खूप सोपं होतं. त्यासाठी माझ्या निष्पाप मुलाची इतक्या क्रूरपणे हत्या करण्याची काय गरज होती?” असा सवाल विशाल अग्रवाल यांनी केला आहे.

केतनचे टक्कल अन् एक गोष्ट खटकायची, पोलिस तपासात सिया लागली घडाघडा बोलू…

खळबळजनक खुलासा! सिया बारावी नापास, दारूचं व्यसन, अनेक बॉयफ्रेंड अन्…

पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल रात्रीच्या अंधारात पोहचले लोहगडावर अन्…

सियाची आई म्हणाली; केतनने मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलं; दोघांनाही ढकलून द्या…

सिया गोयल हिच्या वडिलांचा मोठा खुलासा; सगळं खोटं…

केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट; सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले…

केतन जिवंत असल्याचे पोलिसांनी सांगताच सियाला फुटला घाम…

केतनला संपवण्यासाठी सिया-चेतन महाभयंकर प्लॅन बी होता तयार; पोलिसही चक्रावले…

केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…

पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…

केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…

पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…

पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!